IND vs AUS : पिंक बॉल कसोटीत टीम इंडिया १८० धावांवर ऑलआऊट, मिचेल स्टार्कचे ६ बळी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS : पिंक बॉल कसोटीत टीम इंडिया १८० धावांवर ऑलआऊट, मिचेल स्टार्कचे ६ बळी

IND vs AUS : पिंक बॉल कसोटीत टीम इंडिया १८० धावांवर ऑलआऊट, मिचेल स्टार्कचे ६ बळी

Dec 06, 2024 02:42 PM IST

IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात १८० धावा करून टीम इंडिया ऑलआऊट झाली. यादरम्यान नितीश रेड्डी याने ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. स्टार्कने ६ विकेट घेतल्या.

IND vs AUS : पिंक बॉल कसोटीत टीम इंडिया १८० धावांवर ऑलआऊट, मिचेल स्टार्कचे ६ बळी
IND vs AUS : पिंक बॉल कसोटीत टीम इंडिया १८० धावांवर ऑलआऊट, मिचेल स्टार्कचे ६ बळी (AFP)

IND vs AUS 2nd test innings highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज शुक्रवारपासून दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. या ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ १८० धावांवर ऑलआऊट झाला.  टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मात्र नितीश रेड्डी याने भारतीय संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली.

रेड्डीने ४२ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मिचेल स्टार्कने ६ विकेट घेतल्या.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताची दुसरी विकेट केएल राहुलच्या रूपाने पडली. ६४ चेंडूंचा सामना करताना तो ३७ धावा करून बाद झाला. राहुलने या खेळीत ६ चौकार मारले. विराट कोहलीने संघाची तिसरी विकेट घेतली आणि अवघ्या ७ धावा करून बाद झाला.

कर्णधार रोहित फ्लॉप -

शुभमन गिल आणि राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी रचली गेली. पण ते फार काळ टिकू शकले नाही. शुभमन ५१ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. त्याने ५ चौकार मारले. ऋषभ पंतने ३५ चेंडूंचा सामना करत २१ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ३ धावा करून बाद झाला. त्यांना विशेष काही करता आले नाही. अश्विनने ३ चौकारांच्या मदतीने २२ धावा केल्या. हर्षित राणाला खातेही उघडता आले नाही.

नितीश रेड्डीने दिले चोख उत्तर

रेड्डीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याने ५४ चेंडूंचा सामना करत ४२ धावा केल्या. रेड्डीच्या या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. मोहम्मद सिराजने एका चौकाराच्या सहाय्याने नाबाद ४ धावा केल्या.

मिचेल स्टार्कचे ६ विकेट

मिचेल स्टार्क भारतासाठी जीवघेणा ठरला. त्याने १४.१ षटकात ४८ धावा देत ६ बळी घेतले. त्याने २ मेडन ओव्हर्स घेतले. कर्णधार पॅट कमिन्सने २ बळी घेतले. त्याने १२ षटकात ४१ धावा दिल्या. स्कॉट बोलंडने १३ षटकांत ५४ धावांत २ बळी घेतले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या