IND vs AUS : नितीश रेड्डी पदार्पण करणार! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS : नितीश रेड्डी पदार्पण करणार! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

IND vs AUS : नितीश रेड्डी पदार्पण करणार! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Nov 11, 2024 10:48 PM IST

India Playing 11 Vs Australia 1st Test : कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या सामन्यात त्याच्या जागी जसप्रीत बुमराह कर्णधार असेल.

IND vs AUS : नितीश रेड्डी पदार्पण करणार! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
IND vs AUS : नितीश रेड्डी पदार्पण करणार! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन (HT_PRINT)

न्यूझीलंडने मायदेशात दिलेल्या जखमा टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियात भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियातील मालिका कोणत्याही किंमतीत जिंकावीच लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.

या मालिकेसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. अशा स्थितीत पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू  शकते हे आपण येथे जाणून घेणार आहोत.

रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नाही

कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या सामन्यात त्याच्या जागी जसप्रीत बुमराह कर्णधार असेल.

सोमवारी (११ नोव्हेंबर) सकाळी प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, त्याने संकेत दिले की जर रोहित पहिल्या कसोटीत उपलब्ध नसेल तर केएल राहुल डावाची सुरुवात करेल.

नितीशकुमार रेड्डी यांचे पदार्पण निश्चित!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी पदार्पण करणार असल्याचे मानले जात आहे. नितीश ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाचा भाग होता. भक्कम फलंदाजीसोबतच तो वेगवान गोलंदाजीही करू शकतो. या कारणामुळे त्याचा अंतिम अकरामध्ये समावेश होऊ शकतो.

पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळेल.

यानंतर ६, ७ आणि ८ क्रमांकावर तीन अष्टपैलू खेळाडू असतील. यामध्ये नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा खेळण्याची शक्यता आहे. रविचंद्रन अश्विन बेंचवर बसलेला दिसू शकतो. 

त्यानंतर तीन वेगवान गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहसोबत ॲक्शनमध्ये दिसू शकतात. अशा स्थितीत आकाशदीपला बाकावर बसावे लागू शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.

Whats_app_banner