IND vs AUS ODI : भारत-ऑस्ट्रेलिया थरार फ्रीमध्ये कसा पाहणार? भारतीय वेळेनुसार किती वाजता सामना? पाहा
IND vs AUS 1st ODI Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मोहाली येथे होणार आहे.
IND vs AUS 1st ODI Live Streaming Online : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना आज (२२ सप्टेंबर) मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची वनडे मालिका आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल भारताचे नेतृत्व करेल. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह काही खेळाडूंना पहिल्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया पहिला सामना कधी, कुठे खेळला जाईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना आज रविवारी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होईल.
भारत-ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर लाइव्ह कसा पाहणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला सामना भारतात स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल.
भारत-ऑस्ट्रेलिया सामना विनामूल्य कुठे पाहायचा?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना JioCinema च्या अॅप आणि वेबसाइटवर विनामूल्य लाइव्ह स्ट्रीम केला जाईल. तुम्ही मोबाईल लॅपटॉप, टीव्ही किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे हेड टू हेड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १४६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत ८२ सामने जिंकले आहेत. तर भारताने ५४ सामने जिंकले आहेत. तर एकूण १० सामने अनिर्णित राहिले आहेत.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ
केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी. सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण.
वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनी , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.