KL Rahul: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतून केएल राहुलला का वगळलं? जाणून घ्या कारण-ind vs afg why kl rahul was omitted from afghanistan t20is ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KL Rahul: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतून केएल राहुलला का वगळलं? जाणून घ्या कारण

KL Rahul: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतून केएल राहुलला का वगळलं? जाणून घ्या कारण

Jan 08, 2024 01:10 PM IST

IND vs AFG: नुकतीच बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

KL Rahul
KL Rahul (PTI)

India vs Afghanistan T20Is: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेतून भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. परंतु, भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज केएल राहुलला वगळण्यात आले. यामागचे खरे कारण समोर आले आहे.

विराट आणि रोहितशिवाय संजू सॅमसनही संघात परतला. परंतु, अफगाणिस्तानविरुद्धच्या संघात केएल राहुलचे नाव नव्हते. यामुळे त्याचा टी-२० संघासाठी विचार केला जाणार नसल्याची चर्चा सुरू झाली. निवड समितीने केएल राहुलकडे सलामीवीर किंवा टी-२० मध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पाहिले नाही. राहुलने एकदिवसीय आणि कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र,तो टी-२० संघाबाहेर आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, केएल राहुलची तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. कारण निवडकर्त्यांनी सुरुवातीच्या आणि मधल्या फळीतील दोन्ही स्थानांसाठी इतर खेळाडूंना संधी दिली आहे. केएल राहुलने त्याचे बहुतेक टी-२० आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत टी-२० सामने सलामीवीर म्हणून खेळले आहेत. परंतु, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यामुळे उदयाने केएल राहुलसाठी अवघड झाले. याशिवाय, रोहित आणि विराट कोहली संघात परतल्याने टॉप बॅटींग ऑर्डरमध्ये एकही जागा रिक्त नाही.

केएल राहुलसाठी टी-२० संघाचे दरवाजे बंद झाले आहेत, असे नाही. आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्याने प्रतिस्पर्धी ईशान किशन, संजू सॅमसन, ऋषभ पंत आणि जितेश शर्मा यांच्यापेक्षा अधिक धावा केल्यास तो आगामी टी-२० विश्वचषकात संघात स्थान मिळवू शकतो. मात्र, त्यावेळी केएल राहुल कितव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा टी-२० संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार .

विभाग