टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज (२० जून) टीम इंडिया आपला सुपर-८ चा पहिला सामना खेळणार आहे. आज बार्बाडोस येथे भारतीय संघ राशीद खानच्या अफगाणिस्तानला भिडणार आहे. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.
विराट कोहलीचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, विराट कोहलीचा फॉर्म हा फारसा चिंतेचा विषय नसल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. रोहित शर्माचाही फॉर्म चांगला नाही. भारतासाठी दिलासादायक बातमी म्हणजे सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतला आहे.
तर दुसरीकडे अफगाणिस्तानने आपल्या दमदार गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.
रोहित शर्माने ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. पण सुपर-८ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार, हे जवळपास निश्चित दिसत आहे. हा बदल मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्या रूपाने होऊ शकतो.
रोहित ब्रिगेडने न्यू यॉर्कमध्ये ग्रुप स्टेजचे पहिले ३ सामने खेळले, जिथे वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळाली. त्यानंतर संघाचा चौथा सामना फ्लोरिडामध्ये होणार होता, जो पावसामुळे रद्द झाला. न्यू यॉर्कमध्ये टीम इंडियाने तीन मुख्य वेगवान गोलंदाजांसह हार्दिक पांड्याचा चांगला वापर केला होता, ज्यामुळे त्यांना ४ वेगवान गोलंदाजीचे पर्याय मिळाले.
आता सुपर-८ चे सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत, जिथे स्पिनर्सचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात फिरकी विभाग मजबूत करण्यासाठी रोहित शर्मा कुलदीप यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतो. मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीपचा समावेश केला जाऊ शकतो. कुलदीपच्या आगमनाने टीम इंडियाकडे ३ फिरकीचे पर्याय असतील. संघात उपस्थित रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी पहिले ३ सामने खेळले.
हार्दिक पांड्यासोबत संघाकडे ३ वेगवान गोलंदाजीचे पर्यायही असतील. अशाप्रकारे, प्लेइंग इलेव्हनमधील बदलांमुळे भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमात कोणताही फरक पडणार नाही.
भारत:- रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, नजीबुल्ला झदरान करीम जनात, रशीद खान, मोहम्मद नबी, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
संबंधित बातम्या