मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AFG : ठरलं! सुपर ८ मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्ताविरुद्ध, तारीख, वेळ, ठिकाण जाणून घ्या

IND vs AFG : ठरलं! सुपर ८ मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्ताविरुद्ध, तारीख, वेळ, ठिकाण जाणून घ्या

Jun 14, 2024 11:39 AM IST

Ind vs Afg Super 8 match : सुपर ८ मध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. आणि याआधी भारत अफगाणिस्तानला भिडणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान सामना २० जूनला रंगणरा आहे.

IND vs AFG : ठरलं! सुपर ८ मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्ताविरुद्ध, तारीख, वेळ, ठिकाण जाणून घ्या
IND vs AFG : ठरलं! सुपर ८ मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्ताविरुद्ध, तारीख, वेळ, ठिकाण जाणून घ्या

अफगाणिस्तानने पीएनजीला हरवून टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-८ मध्ये अफगाणिस्तानचा पहिला सामना भारतासोबत होणार आहे. टीम इंडिया आधीच सुपर ८ मध्ये पोहोचली आहे.

भारताने आतापर्यंत ३ सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत. भारताचा शेवटचा गट सामना कॅनडाविरुद्ध आहे. अफगाणिस्तानबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा शेवटचा गट सामना वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. यानंतर सुपर ८ सामन्यांना सुरूवात होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर ८ सामना बार्बाडोस येथे होणार आहे. हा सामना २० जून रोजी रात्री ८ वाजता खेळला होईल. टीम इंडियाचे सर्व सामने रात्री ८ वाजल्यापासून खेळवले जातील. भारतीय चाहत्यांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना चाहत्यांना मोबाईलवर मोफत पाहता येणार आहे. यासाठी हॉट स्टार ॲप मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. सुपर ८ मध्ये अफगाणिस्तानचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना २२ जून रोजी होणार आहे.

टीम इंडिया अ गटात आहे. भारताने ३ सामने खेळले आणि तिन्ही जिंकले. त्यांचे ६ गुण आहेत. अ गटातून सुपर ८ साठी पात्र ठरणारा भारत हा पहिला संघ आहे. अफगाणिस्तान क गटात आहे. त्यांनीही आतापर्यंत ३ सामने खेळले आणि तिन्ही जिंकले. त्यांचेही ६ गुण आहेत. या गटातून वेस्ट इंडिजही सुपर ८ साठी पात्र ठरला आहे. वेस्ट इंडिजचेही ६ गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट अफगाणिस्तानपेक्षा कमी आहे.

सुपर ८ मध्ये भारताचे सामने कधी आणि कोणाविरुद्ध?

सुपर ८ मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. यानंतर टीम इंडियाचा सामना ड गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होणार आहे. हा सामना २२ जून रोजी अँटिग्वा येथे होणार आहे.

भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना २४ जून रोजी सेंट लुसिया येथे होणार आहे. यानंतर स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना २६ जून रोजी तर दुसरा उपांत्य सामना २७ जून रोजी होणार आहे. अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे.

WhatsApp channel