टी-20 वर्ल्डकप २०२४ मधील सुपर-८ चे सामने खेळण्यासाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजला पोहोचली आहे. भारतीय संघ गुरुवारी (२० जून) बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर अफगाणिस्तान संघाला भिडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना खेळवला जाईल.
या सामन्यापूर्वी केन्सिंग्टन ओव्हल या मैदानाची खेळपट्टी कशी असेल, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना बाउंस देते आणि स्विंगही देते. याशिवाय ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही उपयुक्त ठरली आहे. त्याचबरोबर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला या खेळपट्टीवर फायदा होतो. अशा स्थितीत नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल.
केन्सिंग्टन ओव्हलवर आतापर्यंत एकूण ४७ टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३० सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने १७ सामने जिंकले आहेत. येथील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १३८ धावा आहे.
बार्बाडोसच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या साखळी फेरीतील सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने २० षटकात २०१ धावा केल्या होत्या.
भारत वि. अफगाणिस्तान सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर रंगणार आहे. येथील हवामान सामन्यादरम्यान ढगाळ असेल. परंतु पावसाची शक्यता फारच कमी आहे. जे दोन्ही संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी चांगले आहे.
बार्बाडोसच्या वेळेनुसार हा सकाळी होणार आहे. तापमान २७ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
भारत:- रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, नजीबुल्ला झदरान करीम जनात, रशीद खान, मोहम्मद नबी, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.