मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AFG T20 : भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, रोहित-विराटची एन्ट्री होणार? पाहा

IND vs AFG T20 : भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, रोहित-विराटची एन्ट्री होणार? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 05, 2024 06:49 PM IST

IND vs AFG T20 Series Schedule : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. उभय संघांमधला पहिला टी-२० सामना ११ जानेवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता मोहाली येथे खेळवला जाईल.

IND vs AFG T20 Series Schedule
IND vs AFG T20 Series Schedule

India vs Afghanistan T20 Series Schedule : दक्षिण आफ्रिकेच्या प्रदीर्घ दौऱ्यानंतर टीम इंडिया आता मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 

रोहित-विराटचे टी-20 मध्ये पुनरागमन?

या मालिकेत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दिसणार नाहीत. हे दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. तर सिराज आणि बुमराह यांना विश्रांती मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेतून टी-20 संघात पुनरागमन करू शकतात.

सीनियर खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी स्वतःला T20 फॉरमॅटसाठी उपलब्ध घोषित केले आहे. कोहली आणि रोहितने टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पहिला सामना मोहालीत

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. उभय संघांमधला पहिला टी-२० सामना ११ जानेवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता मोहाली येथे खेळवला जाईल.

यानंतर दुसरा टी-२० सामना १४ जानेवारीला ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाईल. त्याचवेळी, या मालिकेतील तिसरा टी-20 सामना १७ जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळला जाणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली

दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर

तिसरा T20- १७ जानेवारी- बेंगळुरू

भारत-अफगाणिस्तान टी-20 कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार?

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका स्पोर्ट्स18 – 1 (SD + HD) आणि स्पोर्ट्स 18 – 2 या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा अ‍ॅपवर पाहता येईल.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi