india vs afganistan 3rd t20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले आहेत. संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव संघात परतले आहेत. त्याचवेळी जितेश शर्मा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग खेळत नाहीत. अफगाणिस्तानच्या प्लेइंग-११ मध्येही तीन बदल करण्यात आले आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन) - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात जितेश शर्माच्या जागी भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. संजूला ही सुवर्णसंधी मिळाली आहे. या सामन्यात त्याची फलंदाजी आली तर त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागेल, कारण यानंतर भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल खेळणार आहेत.
त्यामुळे वर्ल्डकपाआधी हा शेवटचा टी-20 सामना आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियात विकेटकीपिंगसाठी खूप स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत संजूला तो वर्षानुवर्षे आयपीएलमध्ये करत असलेली चमकदार कामगिरी या सामन्यातही करावी लागणार आहे.
टीम इंडियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता जर भारतीय संघाने तिसरा सामनाही जिंकला तर अफगाणिस्तानला क्लीन स्वीपसह पराभूत करेल. विशेष म्हणजे, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही पहिला द्विपक्षीय मालिका आहे.
संबंधित बातम्या