IND Vs AFG T20 : रोहित शर्मा बनला टी-20 शतकांचा बादशहा, रिंकू सिंगचे अर्धशतक, भारताच्या २१२ धावा-ind vs afg t20 cricket scorecard today match india vs afghanistan 3rd t20 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs AFG T20 : रोहित शर्मा बनला टी-20 शतकांचा बादशहा, रिंकू सिंगचे अर्धशतक, भारताच्या २१२ धावा

IND Vs AFG T20 : रोहित शर्मा बनला टी-20 शतकांचा बादशहा, रिंकू सिंगचे अर्धशतक, भारताच्या २१२ धावा

Jan 17, 2024 08:56 PM IST

IND Vs AFG T20 Scorecard : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

IND Vs AFG T20 Scorecard
IND Vs AFG T20 Scorecard (AP)

India vs Afghanistan 3rd T20 : टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज बेंगळुरूमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावत २१२ धावा केल्या. आता अफगाणिस्तान संघासमोर २१३ धावांचे लक्ष्य आहे.

सामन्यात एकेकाळी भारतीय संघाने २२ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल ४ धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे (१) आणि संजू सॅमसन (००) देखील बाद झाले आहे. 

रोहित शर्माचे टी-20 मध्ये पाचवे शतक

मात्र यानंतर रोहित शर्माने रिंकू सिंगच्या साथीने डावाची सुत्रे हाती घेत ५व्या विकेटसाठी ९५ चेंडूत १९० धावांची भागीदारी केली.

यादरम्यान रोहित शर्माने ६४ चेंडूत शतक झळकावत इतिहास रचला. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

यानंतर रिंकू सिंगने आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे अर्धशतकही झळकावले. त्याने ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 

या सामन्यात रोहितने ६९ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ११ चौकार मारले. दुसरीकडे, रिंकूने ३९ चेंडूत ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारले.

शेवटच्या ५ षटकात १०३ धावा

शेवटच्या पाच षटकात भारताने एकही विकेट न गमावता १०३ धावा केल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी करीम जनत आला आणि या षटकात रोहित आणि रिंकूने ३६ धावा केल्या. 

रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रोहितने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. हा  नो बॉल होता. फ्री हिटवर रोहितने पुन्हा षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. रिंकूने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर रिंकूने शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन) - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.