टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज (२० जून) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर ८ चा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांनी ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी केली होती. आता दोन्ही संघांची नजर विजयी घौडदौड काय ठेवण्यावर आहे.
६ षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या ३ विकेटवर ३५ धावा आहे. अफगाणिस्तान संघाला आता विजयासाठी ८४ चेंडूत १४७ धावा करायच्या आहेत. उमरझाई ६ चेंडूत ५ धावांवर तर गुलबदिन नायब ७ चेंडूत ७ धावांवर खेळत आहेत.
अफगाणिस्तानची पहिली विकेट दुसऱ्याच षटकात पडली. गुरबाजला बुमराहने विकेटच्या मागे झेलबाद केले. तो ८ चेंडूत ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गुरबाजने पहिल्याच षटकात १ चौकार आणि १ षटकार मारला होता.
सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक आणि हार्दिक पांड्यासोबतची भागीदारी यांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर ८ टप्प्यातील सामन्यात २० षटकांत ८ गडी गमावून १८१ धावा केल्या.
सूर्यकुमार २८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून बाद झाला. त्याच्याशिवाय भारताचा उपकर्णधार हार्दिकने २४ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. शेवटी अक्षर पटेलने काही चांगले फटके खेळले ज्याच्या जोरावर भारताला १८० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.
या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाने ११ धावांवर रोहित शर्माच्या (८) रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर ऋषभ पंत (२०) आणि विराट कोहली (२४) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर १९ धावांत ४ गडी गमावल्याने पुन्हा एकदा संघ अडचणीत दिसत होता.
यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने डावाची सुत्रे हाती घेतली. दोघांमध्ये ३७ चेंडूत ६० धावांची भागीदारी झाली. सूर्याने २७ चेंडूत सलग दुसरे अर्धशतक झळकावले. तो २८ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. सूर्याने ३ षटकार आणि ५ चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट १८९.२८ होता.
अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी ३ बळी घेत भारतीय फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. मात्र, सूर्यकुमार यादव आणि हार्दिकने पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.
भारतीय संघाने १९ व्या षटकात १६५ धावांवर सातवा विकेट गमावला आहे. रवींद्र जडेजा पाच चेंडूंत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यात ३१ चेंडूत ४८ धावांची भागीदारी आहे. १६ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ४ विकेटवर १३८ धावा आहे. सूर्यकुमार यादव २३ चेंडूत ४२ धावांवर खेळत आहे. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. हार्दिक पांड्या १८ चेंडूत २४ धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार आणि १ षटकार मारला आहे.
१५ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ४ विकेटवर १२६ धावा आहे. सूर्यकुमार यादव २१ चेंडूत ४१ धावांवर खेळत आहे. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. तर हार्दिक पांड्या १४ चेंडूत २ चौकारांसह १३ धावांवर खेळत आहे.
१२ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ४ विकेटवर ९८ धावा आहे. सूर्यकुमार यादव १२ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला आहे. तर हार्दिक पांड्या ५ चेंडूत ६ धावांवर खेळत आहे.
१० षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ३ विकेटवर ७९ धावा आहे. या षटकात शिवम दुबेने समोरच्या बाजूने शानदार षटकार ठोकला. सूर्यकुमार यादव ६ चेंडूत ९ धावांवर खेळत आहे. तर शिवम दुबे सहा चेंडूत १० धावांवर खेळत आहे.
राशिद खानने ९व्या षटकात टीम इंडियाला तिसरा धक्का दिला आहे. भारताने ६२ धावांत ३ महत्त्वाचे विकेट गमावले आहेत. विराट कोहली २४ चेंडूत केवळ २४ धावा करून बाद झाला. किंग कोहलीला रशीद खानने बाऊंड्रीवर झेलबाद केले.
५ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटवर ३४ धावा आहे. नवीन उल हकच्या चेंडूवर विराट कोहलीने शानदार षटकार ठोकला. तो १४ चेंडूत १६ धावांवर आहे. तर ऋषभ पंत तीन चेंडूत एका चौकारासह ७ धावांवर खेळत आहे.
तिसऱ्या षटकात फजलहक फारुकीने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा झेलबाद झाला. हिटमॅन १३ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. राशिद खानने रोहितचा झेल घेतला.
अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा डाव सुरू झाला असून कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली क्रीझवर आला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
सुपर ८ सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला आहे. संघाने संघात एकमेव बदल केला आहे. सिराजच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळाली आहे.
अफगाणिस्ताननेही संघात बदल केला आहे. करीम जनत या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी हजरतुल्ला झाझईचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी या विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी हिरो बनला आहे. त्याने ४ सामन्यांत १२ विकेट घेतल्या आहेत आणि तो आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. सलामीवीर म्हणून रोहित आणि विराटला त्याचा सामना करणे सोपे नसेल. नवीन चेंडूने त्याला खूप स्विंग मिळाले आहे. त्याला खेळणे आतापर्यंत सोपे नव्हते.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण ८ टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने ७ सामने जिंकले आहेत. तर एकाचा निकाल लागला नाही. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले आहेत. भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. एवढेच नाही तर या दोन्ही संघांमधील मागील ३ सामने भारताने जिंकले आहेत.
केन्सिंग्टन ओव्हलवर आतापर्यंत एकूण ४७ टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३० सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने १७ सामने जिंकले आहेत. येथील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १३८ धावा आहे.
बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना बाउंस देते आणि स्विंगही देते. याशिवाय ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही उपयुक्त ठरली आहे. त्याचबरोबर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला या खेळपट्टीवर फायदा होतो. अशा स्थितीत नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल.
भारत वि. अफगाणिस्तान सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर रंगणार आहे. येथील हवामान सामन्यादरम्यान ढगाळ असेल. परंतु पावसाची शक्यता फारच कमी आहे. जे दोन्ही संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी चांगले आहे.
बार्बाडोसच्या वेळेनुसार हा सकाळी होणार आहे. तापमान २७ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या