मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AFG : भारताने टी-20 मालिका जिंकली, इंदूरमध्ये जैस्वाल-दुबेचे वादळ

IND vs AFG : भारताने टी-20 मालिका जिंकली, इंदूरमध्ये जैस्वाल-दुबेचे वादळ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 14, 2024 01:17 PM IST

IND Vs AFG T20 : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची टी-20 मालिका जिंकली आहे. इंदुरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला.

IND vs AFG Live Score :
IND vs AFG Live Score : (PTI)

India Vs Afghanistan score : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत १७२ धावांवर सर्वबाद झाला. टीम इंडियाने १५.४ षटकात ४ विकेट गमावत १७३ धावा करत सामना जिंकला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १७ जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकी खेळी खेळली. यशस्वीने सर्वाधिक ६८ धावा केल्या. यशस्वीने ३४ चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी केली. त्याने ६ षटकार आणि ५ चौकार मारले. तर शिवम दुबेने नाबाद ६३ धावा केल्या. त्याने ३२ चेंडूंच्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार मारले. शिवमचा स्ट्राईक रेट १९६.८८ होता.

कोहलीची झंझावाती खेळी

विराट कोहली १४ महिन्यांनंतर टी-20 परतला. त्याने आज १६ चेंडूत २९ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १८१.२५ होता. रोहित शर्मा आणि जितेश शर्मा हे दोघेही शुन्यावर बाद झाले. रिंकू सिंगने नाबाद ९ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून करीम जनातने २ गडी बाद केले. फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Ind vs Afg Cricket Score Updates

IND vs AFG Live Score : नवीन उल हकने काढली कोहलीची विकेट

नवीन उल हकने भारताला दुसरा धक्का दिला. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने विराट कोहलीला बाद केले. कोहलीने १६ चेंडूत २९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार मारले. विराटने यशस्वीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली.

IND vs AFG Live Score : रोहित शर्मा शून्यावर बाद

रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला. सलग दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितला फजलहक फारुकीने क्लीन बोल्ड केले.  पहिल्या षटकात एका विकेटच्या मोबदल्यात ५ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.

IND vs AFG Live Score : अफगाणिस्तानच्या १७२ धावा

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १७२ धावा केल्या आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी १७३ धावा करायच्या आहेत.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. गुलबदिन नायबने २८ चेंडूत अर्धशतक केले. या सामन्यात त्याने ३५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. मुजीब उर रहमानने ९ चेंडूत २१ आणि करीम जनातने १० चेंडूत २० धावा फटकावल्या.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानचे महत्वाचे फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १४ धावा केल्या. कर्णधार इब्राहिम झद्रान ८ धावा करून बाद झाला तर अजमतुल्ला ओमरझाई दोन धावा करून बाद झाला.

भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी २ विकेट मिळाले.

IND vs AFG Live Score : मोहम्मद नबी बाद

रवी बिश्नोईने अफगाणिस्तानला पाचवा धक्का दिला. त्याने १५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद नबीला बाद केले. नबीने १८ चेंडूत १४ धावा केल्या. बिश्नोईच्या चेंडूवर रिंकू सिंगने झेल घेतला. अफगाणिस्तानने १६ षटकात ५ विकेट गमावत ११७ धावा केल्या आहेत. करीम जनात ७ धावांवर तर नजीबुल्ला झद्रान ६ धावांवर खेळत आहेत.

IND vs AFG Live Score : गुलबदिन नायब बाद

अक्षर पटेलने गुलबदिन नायबचा डाव संपवला. नायबने शानदार फलंदाजी करत झंझावाती अर्धशतक झळकावले. तो ३५ चेंडूत ५७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नायबने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार मारले. अफगाणिस्तानने १३ षटकात ४ विकेट गमावत ९८ धावा केल्या आहेत. मोहम्मद नबी ११ तर नजीबुल्ला झद्रान एका धावेवर खेळत आहेत.

IND vs AFG Live Score : अफगाणिस्तानला तिसरा धक्का

शिवम दुबेने अफगाणिस्तानला तिसरा धक्का दिला. त्याने अजमतुल्ला उमरझाईला बोल्ड केले. उमरझाईला केवळ २ धावा करता आल्या. अफगाणिस्तानने ९ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ७७ धावा केल्या आहेत. गुलबदीन नायब ४८ २आणि मोहम्मद नबी २ धावांवर खेळत आहेत.

IND vs AFG Live Score : इब्राहिम झद्रान बाद

अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झद्रान १० चेंडूत ८ धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इब्राहिमला क्लीन बोल्ड केले. अफगाणिस्तानने ६ षटकांत २ गडी बाद ५८ धावा केल्या आहेत. गुलबदीन नायब १६ चेंडूत ३२ धावांवर खेळत असून अजमतुल्ला उमरझाई आताच क्रीजवर आला आहे.

IND vs AFG Live Score : अफगाणिस्तानला पहिला धक्का

रवी बिश्नोईने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. त्याने रहमानउल्ला गुरबाजला शिवम दुबेकरवी झेलबाद केले. गुरबाजने अफगाणिस्तानला वेगवान सुरुवात करून दिली होती. त्याने ९ चेंडूत १४ धावा केल्या. त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला. सध्या इब्राहिम झद्रान आणि गुलबदिन नायब क्रीजवर आहेत. अफगाणिस्तानने ३ षटकात एक विकेट गमावत २२ धावा केल्या आहेत.

IND vs AFG Live Score : दोन्ही प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

Ind vs Afg Live : भारताची प्रथम गोलंदाजी

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल आज खेळत आहेत. शुभमन गिल आणि तिलक वर्मा बाहेर आहेत.

Ind vs Afg Live : रोहितसोबत ओपनिंगला कोण खेळणार?

स्वत: कर्णधार रोहित शर्मावर धावा करण्याचे दडपण असेल. दरम्यान रोहितसोबत ओपनिंगला कोण येते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विराट, यशस्वी किंवा शुबमन गिल यांच्यापैकी एकजण रोहितसोबत ओपनिंगला येऊ शकतो.

Ind vs Afg Live : होळकर स्टेडियमवर धावांचा पाऊस पडतो

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. या मैदानावर नेहमीच हाय स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. 

मात्र, फिरकीपटूंना खेळपट्टीवरून थोडीफार मदत मिळू शकते. खेळपट्टीवर चांगल्या बाऊन्समुळे, चेंडू अगदी सहजपणे बॅटवर येतो, यामुळे फलंदाजांना शॉट्स खेळणे सोपे जाते.

त्याच वेळी, येथील आउटफिल्ड देखील खूप वेगवान आहे. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० पेक्षा जास्त धावा केल्या तरी या धावांचा बचाव करणे गोलंदाजांसाठी सोपे जाणार नाही.

Ind vs Afg Live : टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेईल

नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो जेणेकरून नंतर दव आल्यावर लक्ष्याचा पाठलाग अधिक सहज करता येईल.

मात्र, आतापर्यंत येथे झालेल्या तीन टी-२० सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे, तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ एकदाच विजय मिळवला आहे.

Ind vs Afg Live : दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान- हमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi