मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs AFG T20 Highlights : पहिल्या टी-20 मध्ये भारताचा शानदार विजय, शिवम दुबेचे तुफानी अर्धशतक

IND Vs AFG T20 Highlights : पहिल्या टी-20 मध्ये भारताचा शानदार विजय, शिवम दुबेचे तुफानी अर्धशतक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 11, 2024 01:41 PM IST

Ind vs Afg Cricket Scorecard : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना आज मोहालीत खेळला गेला. या सामन्यात भारताने ६ विकेट्सनी विजय मिळवला.

IND vs AFG T20 Live Score
IND vs AFG T20 Live Score (Afghanistan Cricket Board-X)

India vs Afganistan 1st T20 Match : भारताने पहिल्या T20 मध्ये अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. 

प्रत्युत्तरात भारताने १७.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. शिवम दुबेने ४० चेंडूत ६० धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी, रिंकू सिंग ९ चेंडूत १६ धावा करून नाबाद राहिला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.

Ind vs Afg Cricket Score Updates

Ind vs Afg Live Score : जितेश शर्मा बाद

भारताने १४ षटकात ४ गडी गमावून १२१ धावा केल्या आहेत. टीम इंडियाला आता ३६ चेंडूत ३८ धावांची गरज आहे. सध्या रिंकू सिंग आणि शिवम दुबे क्रीजवर आहेत. जितेश शर्माच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला. मुजीबने जितेशला झद्रानकरवी झेलबाद केले. तो २० चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३१ धावा करून बाद झाला. त्याने शिवमसोबत ४५ धावांची भागीदारी केली.

Ind vs Afg Live Score : भारताला तिसरा धक्का

भारताला नवव्या षटकात तिसरा धक्का बसला. तिलक वर्मा २२ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा करून बाद झाला. त्याला अजमतुल्ला उमरझाईने गुलबदिन नायबच्या हाती झेलबाद केले. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ७४ धावा आहे. सध्या शिवम दुबे आणि जितेश शर्मा क्रीजवर आहेत.

Ind vs Afg Live Score : शुभमन गिल बाद

चौथ्या षटकात २८ धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. शुभमन गिल १२ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २३ धावा करून बाद झाला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर त्याला गुरबाजने यष्टिचित केले. आता तिलक वर्मा आणि शिवम दुबे क्रीजवर आहेत. ४ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात २८ धावा आहे.

Ind vs Afg Live Score : रोहित शर्मा धावबाद

भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. रोहित शर्मा धावबाद झाला. शॉट खेळल्यानंतर तो धाव घेण्यासाठी धावला. पण दुसऱ्या एंडला उभा असलेला शुभमन बॉलकडे पाहत होता. तो धावला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी रोहितला धावबाद केले.

Ind vs Afg Live Score : अफगाणिस्तानच्या १५८ धावा

अफगाणिस्तानने पाच गडी गमावून १५८ धावा केल्या आहेत. भारतासमोर १५९ धावांचे लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करणे भारतीय संघासाठी सोपे नसेल. तथापि, हे फार कठीण लक्ष्य नाही. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्याच्याशिवाय अजमतुल्ला उमरझाईने २९ धावांची खेळी खेळली. गुरबाजने २३ आणि कर्णधार झद्रानने २९ धावा केल्या. नजीबुल्लाहने अखेरीस ११ चेंडूत १९ धावांची इनिंग खेळली.

Ind vs Afg Live Score : मोहम्मद नबी बाद

अफगाणिस्तानचा निम्मा संघ १३० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. नबी ४० धावा करून बाद झाला. त्याने २७ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार मारले. त्याला मुकेश कुमारने झेलबाद केले.

Ind vs Afg Live Score : ओमरझाई बोल्ड

अफगाणिस्तानची चौथी विकेट १२५ धावांवर पडली. मुकेश कुमारने अजमतुल्ला ओमरझाईला बोल्ड केले. उमरझाईने २२ चेंडूत २९ धावा केल्या. आता नजीबुल्लाह मोहम्मद नबीसोबत क्रीजवर आहे.

Ind vs Afg Live Score : नबी-ओमरझाईने डाव सावरला

अफगाणिस्तानची धावसंख्या १०० धावांच्या पुढे गेली आहे. ओमरझाई आणि नबी संघासाठी शानदार फलंदाजी करत आहेत. अफगाणिस्तानने १६ षटकांत ३ गडी गमावून १२० धावा केल्या आहेत. ओव्हरजाई २७ तर नबी ४० धावा करून खेळत आहे. दोघांमध्ये अर्धशतकीय भागिदारी झाली आहे.

Ind vs Afg Live Score : अक्षरने गुरबाजला तर दुबेने झद्रानला बाद केले

अफगाणिस्तानने ५० धावांवर २ विकेट गमावल्या आहेत. त्यांचे दोन्ही सलामीवीर एकामोमाग तंबूत परतले आहेत. झादरानने २२ चेंडूत २५ तर गुरबाजने २८ चेंडूत २५ धावा केल्या.

गुरबाज यष्टीचीत तर झादराने झेलबाद झाला. आता अजमतुल्लाह ओमरझाई आणि रहमत शाह क्रीजवर आहेत.

Ind vs Afg Live Score : पॉवरप्लेमध्ये केवळ ३३ धावा

६ षटकांनंतर अफगाणिस्तानने बिनबाद ३३ धावा केल्या आहेत. सध्या इब्राहिम झद्रान १६ चेंडूत १६ आणि रहमानउल्ला गुरबाज १५ धावा करून क्रीजवर आहे. 

Ind vs Afg Live Score : शिवम दुबेने सोपा झेल सोडला

तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगच्या चेंडूवर शिवम दुबेने इब्राहिम झद्रानचा सोपा झेल सोडला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर मिड-ऑफवर झद्रानने हवेत शॉट खेळला. दुबेने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण चेंडू दुबेच्या हाताला लागून खाली पडला. त्यावेळी झद्रान एक धाव काढून क्रीजवर होता. ४ षटकांनंतर अफगाणिस्तानची बिनबाद २१ धावा आहे. झाद्रानसोबत गुरबाज क्रीजवर आहे.

Ind vs Afg Live Score : पहिले षटक निर्धाव

अर्शदीप सिंगने सामन्याचे पहिले षटक टाकले. हे षटक निर्धाव होते. आता मुकेश कुमारला गोलंदाजीला आला आहे.

Ind vs Afg Live Score : दोन्ही प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

Ind vs Afg Live Score : भारताची प्रथम गोलंदाजी

पहिल्या T20 मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. संजू सॅमसनला संधी मिळाली नाही.

Ind vs Afg Live Score : आज असं असेल मोहालीचं हवामान

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला T20 सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. मोहालीमध्ये सूर्यास्तानंतरच तापमानात घट दिसून येते. यासोबतच प्रचंड दव पडते, त्यामुळे खेळावरही परिणाम होऊ शकतो. सोबतच मोहालीत धुके हीदेखील एक मोठी समस्या असू शकते.

Ind vs Afg Live Score : धुक्यामुळे अडचणी येऊ शकतात

खरे तर, जानेवारी महिन्यात उत्तर भारतात थंडीच्या काळात भरपूर धुके असते. अशा परिस्थितीत, सामना दरम्यान धुके असल्यास, कमी दृश्यमानतेमुळे तो थांबविला जाऊ शकतो आणि रद्द देखील होऊ शकतो.

सामन्याच्या दिवशी किमान तापमान ५ ते ६ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. याशिवाय वारेही वाहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत खेळाडूंना थंडीचाही सामना करावा लागू शकतो.

Ind vs Afg Live Score : मोहालीत भारताचा रेकॉर्ड

टीम इंडियाने मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर आत्तापर्यंत एकूण ४ T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील तीन सामने भारताने जिंकले आहेत. मात्र, येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

दोन्ही संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान : इब्राहिम झादरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरन, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्ला उमरझाई, शरफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद , नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब.

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi