IND Vs AFG 3rd T20 Highlights : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज बेंगळुरूमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावत २१२ धावा केल्या. यानंतर अफगाण संघानेही ६ गडी गमावून २१२ धावा केल्या, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
त्यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. दरम्यान, सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळल्या गेल्या. कारण पहिली सुपर ओव्हर टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १६-१६ धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरही टाय झाली.
यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ५ चेंडूत ११ धावा केल्या. यानंतर कर्णधार रोहित शर्माने फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईकडे गोलंदाजी सोपवली.
यानंतर बिश्नोईने आपल्या फिरकीची जादू दाखवत केवळ १ रन दिला आणि अफगाणिस्तानचे दोन्ही फलंदाज बाद केले. बिश्नोईने मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज यांना झेलबाद केले.
या विजयासह भारतीय संघाने ३ टी-20 सामन्यांच्या मालिकेत अफगाणिस्तानचा ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. या सामन्यात रोहित शर्माने विक्रमी शतक झळकावून धमाका केला. तर रिंकू सिंगनेही झटपट अर्धशतक केले.
पहिला चेंडू: दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गुलबदिन धावबाद.
दुसरा चेंडू : मोहम्मद नबीने एक धाव घेतली
तिसरा चेंडू: गुरबाजने चौकार मारला
चौथा चेंडू: गुरबाजने एक धाव घेतली
पाचवा चेंडू: नबीने षटकार मारला
सहावा चेंडू : नबीने ३ धावा घेतल्या.
पहिला चेंडू: रोहितने एक धाव घेतली
दुसरा चेंडू: यशस्वीने एक धाव घेतली
तिसरा चेंडू: रोहितने षटकार मारला
चौथा चेंडू: रोहितने षटकार मारला
पाचवा चेंडू: रोहितने एक धाव घेतली
सहावा चेंडू: यशस्वीने एक धाव घेतली (सुपर ओव्हर टाय)
पहिला चेंडू: रोहितने षटकार ठोकला
दुसरा चेंडू: रोहितने चौकार मारला
तिसरा चेंडू: रोहितने एक धाव घेतली
चौथा चेंडू: रिंकू सिंग झेलबाद
पाचवा चेंडू: रोहित धावबाद
पहिला चेंडू : मोहम्मद नबी झेलबाद
दुसरा चेंडू: करीम जनतने एक धाव घेतली
तिसरा चेंडू : रहमानउल्ला गुरबाज झेलबाद.
बिष्णोईने सुपर ओव्हरमध्ये केवळ एक धाव दिली आणि दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघानेही ६ बाद २१२ धावाच केल्या. यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी संघासाठी ५०-५० धावा केल्या.
तर मोहम्मद नबीने १६ चेंडूत ३४ आणि गुलबदीन नायबने २३ चेंडूत ५५ धावा केल्या. भारतीय संघाकडून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर आवेश खान आणि कुलदीप यादवने १-१ विकेट घेतली.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकेकाळी टीम इंडियाने अवघ्या २२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या, तिथून रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी मिळून पहिला डाव रचला आणि नंतर विक्रमी भागीदारी केली. टी-20 इंटरनॅशनलमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रमही दोघांमध्ये झाला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १९० धावांची भागीदारी केली.
रोहित आणि रिंकू या दोघांनी भारताची धावसंख्या २० षटकात २१२ धावांपर्यंत पोहोचवली. या सामन्यात रोहितने ६९ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ११ चौकार मारले. दुसरीकडे, रिंकूने ३९ चेंडूत ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारले.