मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs AFG 1st T20 : भारताने पहिला सामना सहज जिंकला, शिवम दुबेचे अर्धशतक

IND Vs AFG 1st T20 : भारताने पहिला सामना सहज जिंकला, शिवम दुबेचे अर्धशतक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 11, 2024 10:10 PM IST

IND Vs AFG 1st T20 Highlights : भारताने पहिला टी-20 सामना जिंकला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना मोहालीत खेळला गेला.

IND Vs AFG 1st T20 Highlights
IND Vs AFG 1st T20 Highlights (AP)

India vs Afghanistan 1st T20 Highlights : भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. पहिला सामना आज गुरुवारी (११ जानेवारी) मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ६ गडी राखून शानदार विजय नोंदवला. अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. मोहाली सामन्याचा हिरो शिवम दुबे ठरला, त्याने ३८ चेंडूत अर्धशतक केले. शिवमने या सामन्यात ४० चेंडूत ६० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय जितेश शर्माने ३१, तिलक वर्माने २६ आणि शुभमन गिलने २३ धावा केल्या.

रोहित शर्मा धावबाद झाला

 १४ महिन्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर धावबाद झाला. शॉट खेळल्यानंतर तो धाव घेण्यासाठी धावला. पण दुसऱ्या एंडला उभा असलेला शुभमन बॉलकडे पाहत होता. तो धावला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी रोहितला धावबाद केले. धावबाद झाल्यानंतर रोहित गिलवर प्रचंड संतापलेला दिसला.

अफगाणिस्तानचा डाव

तत्पूर्वी, या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या होत्या.  अफगाणिस्तान संघाकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाईने २९ धावा केल्या. या सामन्यात नबी आणि ओमरझाई यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली.

या दोन फलंदाजांशिवाय गुरबाजने २३ आणि कर्णधार झाद्रानने २९ धावा केल्या. नजीबुल्लाह झादरानने अखेरीस ११ चेंडूत १९ धावांची इनिंग खेळली.

भारताकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी २-२ विकेट घेतल्या. शिवम दुबेने एक विकेट मिळविला.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi