IND U19 vs AUS U19 Final World Cup : अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना आज (११ फेब्रुवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला जात आहे. बेनानो येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ७गड्यांच्या मोबदल्यात २५३ धावा केल्या. आता भारताला विजयासाठी २५४ करायच्या आहेत.
भारताकडून वेगवान गोलंदाज राज लिंबानी याने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर ऑस्ट्रेलियाकडून हरजरस सिंगने ५५ धावा केल्या.
तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर सॅम कॉन्स्टास स्वस्तात बाद झाला. कॉन्स्टन्स शुन्यावर राज लिंबानीचा बळी ठरला. यानंतर कर्णधार ह्यू वेग्बेन आणि हॅरी डिक्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करत डाव सांभाळला.
पण यानंतर नमन तिवारीने या दोन्ही खेळाडूंना बाद केले. हॅरी डिक्सननेही ४२ धावा केल्या तर ह्यू वेग्बेन ४८ धावांवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाने ९९ धावांमध्ये ३ विकेट गमावल्या होत्या, तेथून भारतीय वंशाचा खेळाडू हरजस सिंग आणि रायन हिक्स यांनी मिळून ६६ धावा जोडल्या. हिक्सला वेगवान गोलंदाज राज लिंबानीने बाद केले. तर हरजस सिंग फिरकीपटू सौमी पांडेचा बळी ठरला. शेवटी ऑलिव्हर पीकने नाबाद ४६ धावा करत ऑस्ट्रेलियाला २५० च्या पुढे नेले.
भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले तर नमन तिवारीने २ बळी घेतले. याशिवाय सौम्या पांडे आणि मुशीर खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.
ऑस्ट्रेलिया: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वायबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफे मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महाली बियर्डमन, कॅलम विडलर.
भारत: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्या पांडे.
संबंधित बातम्या