आज भारत-पाकिस्तान क्रिकेटचा थरार रंगणार, सामना कुठे, कधी आणि लाईव्ह कसं पाहणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आज भारत-पाकिस्तान क्रिकेटचा थरार रंगणार, सामना कुठे, कधी आणि लाईव्ह कसं पाहणार? जाणून घ्या

आज भारत-पाकिस्तान क्रिकेटचा थरार रंगणार, सामना कुठे, कधी आणि लाईव्ह कसं पाहणार? जाणून घ्या

Published Oct 19, 2024 10:24 AM IST

Ind A vs Pak A, Emerging Asia Cup 2024 : इमर्जिंग टी-20 आशिया कप २०२४ मध्ये भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना आज सायंकाळी ७ वाजल्यापासून अल अमिराती क्रिकेट मैदानावर रंगणार आहे.

आज भारत-पाकिस्तान क्रिकेटचा थरार रंगणार, सामना कुठे, कधी आणि लाईव्ह कसं पाहणार? जाणून घ्या
आज भारत-पाकिस्तान क्रिकेटचा थरार रंगणार, सामना कुठे, कधी आणि लाईव्ह कसं पाहणार? जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. उभय संघांमधील सामन्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२४ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा सामना झाला होता, त्यावेळी देखील दोन्ही संघात अतिशय चुरशीचा सामना झाला होता.

आता आजही (१९ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत.

वास्तविक, सध्या इमर्जिंग टी-20 आशिया कप २०२४ ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत भारत-अ आणि पाकिस्तान-अ संघ आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा सामना अल अमिराती क्रिकेट मैदानावर (मिनिस्ट्री टर्फ १) होणार आहे. 

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिलक वर्मा या सामन्यात टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद हरिसच्या हाती असेल. हरिसने पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले आहे.

भारत पाकिस्तान सामना कधी होईल?

भारत-अ आणि पाकिस्तान-अ यांच्यातील उदयोन्मुख T20 आशिया कपचा सामना आज शनिवारी (१९ ऑक्टोबर) खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल.

सामना कुठे होणार?

भारत-अ आणि पाकिस्तान-अ यांच्यातील सामना अल अमिराती क्रिकेट मैदानावर (मिनिस्ट्री टर्फ १) होणार आहे.

भारत-अ आणि पाकिस्तान-अ सामना टीव्हीवर लाइव्ह कोणत्या चॅनेलवर दिसणार?

भारत-अ आणि पाकिस्तान-अ यांच्यातील सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल.

भारत-अ आणि पाकिस्तान-अ सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?

भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील उदयोन्मुख टी-20 आशिया चषक २०२४ सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲपद्वारे केले जाईल.

इमर्जिंग टी-20 आशिया कपसाठी भारतीय संघ- 

तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा (उपकर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, रमणदीप सिंग, नेहल वढेरा, आयुष बडोनी, अनुज रावत (यष्टीरक्षक), साई किशोर, हृतिक शौकीन, राहुल चहर, वैभव अरोरा, अंशुल कंबोज, आकिब खान, रसिक सलाम.

इमर्जिंग टी-20 आशिया कपसाठी पाकिस्तान संघ- मोहम्मद हारिस (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, अराफात मिन्हास, हैदर अली, हसिबुल्ला, मेहरान मुमताज, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद इम्रान जूनियर, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, शाहनवाज दहनी, सुफियान मोकीम, यासिर खान आणि जमान खान .

Whats_app_banner

संबंधित बातम्या