मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला पाकिस्तानी क्रिकेटरची उपस्थिती? शाहनवाज दहानीची पोस्ट चर्चेत

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला पाकिस्तानी क्रिकेटरची उपस्थिती? शाहनवाज दहानीची पोस्ट चर्चेत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 04, 2024 01:59 PM IST

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेरेमनी दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटर शाहनवाज दहानीची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. दहानीने या पोस्टमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर इफ्तिखार अहमद याचा एक फोटो शेअर केला आहे.

anant ambani radhika pre wedding
anant ambani radhika pre wedding

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये केवळ बॉलिवूडच नाही तर जगभरातील अनेक क्रिकेटर्सही सहभागी झाले होते. एमएस धोनी, सचिन, पोलार्डसह अनेक स्टार क्रिकेटपटू या प्री-वेडिंग सोहळ्यात दिसले.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेरेमनी दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटर शाहनवाज दहानीची (Shahnawaz Dahani) एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. दहानीने या पोस्टमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर इफ्तिखार अहमद (Ifitikhar Ahmed) याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत इफ्तिखार अहमद हातात एक कागदाची स्लिप अतिशय काळजीपूर्वक वाचताना दिसत आहेत.

हा फोटो शेअर करताना दहानीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की "अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे आमंत्रण इफ्तिखार भाईलाही आले आहे वाटतं?

यानंतर दहानीने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रावर स्टोरीवरही शेअर केला आहे आणि एक प्रश्न विचारला आहे. दहानीने लिहिले की, इफ्तिकार भाईने काय केलं पाहिजे? प्री -वेडिंगला गेलं पाहिजे की नाही?

या मजेशीर पोस्टनंतर चाहत्यांनीही विविध कमेंट करून इफ्तिकार अहमदची मजा घेतली आहे.

shahnawaz dahani funny inst story
shahnawaz dahani funny inst story

शाहनवाज दहानीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, कारण अनंतच्या प्री-वेडिंगमध्ये पाकिस्तानचा कोणताही खेळाडू सहभागी झाला नव्हता. शाहनवाजने ही पोस्ट ४ मार्च २०२४ रोजी केली आहे, तर प्री-वेडिंग सोहळा १ ते ३ मार्चदरम्यान पार पडला.

पोलार्ड PSL सोडून भारतात आला

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला उपस्थित राहण्यासाठी कायरन पोलार्डने PSL मधून ब्रेक घेतला आहे. पोलार्ड पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्सकडून खेळत आहे. पण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी पोलार्ड PSL सोडून भारतात आला आहे.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला भारतीय क्रिकेटपटूंमध्ये एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, झहीर खान, ईशान किशन यांनी हजेरी लावली.

IPL_Entry_Point