जर टीम इंडिया बाहेर पडली तर WTC फायनल कोण खेळणार? या तीन संघात चुरस
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  जर टीम इंडिया बाहेर पडली तर WTC फायनल कोण खेळणार? या तीन संघात चुरस

जर टीम इंडिया बाहेर पडली तर WTC फायनल कोण खेळणार? या तीन संघात चुरस

Oct 27, 2024 12:47 PM IST

WTC Final 2023-25 : टीम इंडिया पात्र ठरली नाही, तर ऑस्ट्रेलियासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील दुसरा संघ श्रीलंका किंवा न्यूझीलंड असू शकतो. सध्या गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.

जर टीम इंडिया बाहेर पडली तर WTC फायनल कोण खेळणार? या तीन संघात चुरस
जर टीम इंडिया बाहेर पडली तर WTC फायनल कोण खेळणार? या तीन संघात चुरस (HT_PRINT)

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने हरले आहेत. तर तिसरा सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर खेळला जाणार आहे.

पण आता कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळू शकेल की नाही? जर टीम इंडिया WTC फायनलमध्ये नाही गेली तर इतर कोणते दोन संघ फायनल खेळतील?

ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा दावेदार

ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​सायकलच्या अंतिम फेरीसाठी सर्वात मोठा दावेदार आहे. कांगारू संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत, त्यापैकी ८ जिंकले, ३ हरले आणि १ अनिर्णित राहिला.

सध्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६२.५० आहे. ऑस्ट्रेलिया सध्या टीम इंडियापेक्षा मागे आहे. टीम इंडियाची सध्याची विजयाची टक्केवारी ६२.८२ आहे. टीम इंडिया बाहेर पडल्यास, सध्या दुसऱ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल.

श्रीलंका किंवा न्यूझीलंड WTC फायनल खेळू शकतात

जर टीम इंडिया पात्र ठरली नाही, तर ऑस्ट्रेलियासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील दुसरा संघ श्रीलंका किंवा न्यूझीलंड असू शकतो. सध्या गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेने आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी ५ जिंकले, ४ गमावले आणि १ अनिर्णित राहिला. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे. याशिवाय न्यूझीलंडने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी ५ जिंकले आणि ५ गमावले. किवी संघाची विजयाची टक्केवारी ५० आहे.

Whats_app_banner