WTC Final South Africa vs Australia : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिका ३-१ ने जिंकली. भारताकडून वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याने चांगली गोलंदाजी करत ३ विकेट घेतल्या, पण त्या पुरेशा ठरल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी संयम दाखवत सामन्यावर मजबूत पकड राखली.
सिडनी कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात पार केले.
सिडनी कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड चेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये एन्ट्री करणारा दुसरा संघ ठरला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ हंगामातील फायनल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळली जाईल.
WTC फायनल इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने प्रथमच विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला आहे. गेल्या वेळी भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच WTC विजेतेपद पटकावले होते.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील WTC फायनल ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजीची कसोटी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ कागद आणि रेकॉर्डच्या बाबतीत मजबूत दिसत असला तरी दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा फॉर्म पाहता सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: सॅम कॉन्स्टास/नॅथन मॅकस्वीनी, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेट-कीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन , स्कॉट बोलँड/जोश हेझलवुड
WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: एडन मार्कराम, रायन रिकल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, टेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना मफाका.
संबंधित बातम्या