महिला टी-20 विश्वचषक २०२४ आजपासून (३ ऑक्टोबर) सुरू होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दोन सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. दुबई आणि शारजाह येथे खेळल्या जाणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक २०२४ च्या पहिल्या दिवशी आज (३ ऑक्टोबर) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंडच्या महिला संघांमध्ये होणार आहे. दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या महिला संघांमध्ये होणार आहे.
बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना शारजाहमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना शारजाहमध्ये संध्याकाळी ७:३० वाजता खेळवला जाईल.
तर टीम इंडियाचा या स्पर्धेतील पहिला सामना रविवारी (४ ऑक्टोबर) पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
आजपासून सुरू होत असलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२० ऑक्टोबर) होणार आहे. १८ दिवसांत एकूण २३ सामने पाहायला मिळतील. याआधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती, पण तिथली परिस्थिती लक्षात घेऊन आयसीसीने ती तिथून हलवण्याचा निर्णय घेतला.
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
३ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड (शारजा)
३ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (शारजा)
४ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (दुबई)
५ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड (शारजा)
५ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (शारजा)
६ ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड (दुबई)
७ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (शारजा)
८ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (शारजा)
९ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड (दुबई)
१० ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज (शारजा)
११ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
१२ ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (शारजा)
१२ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दुबई)
१३ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड (शारजा)
१४ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (दुबई)
१५ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (दुबई)
१७ ऑक्टोबर : उपांत्य फेरी १ (दुबई)
१८ ऑक्टोबर : उपांत्य फेरी २ (शारजाह)
२० ऑक्टोबर : फायनल (दुबई)
संबंधित बातम्या