India vs Pakistan: बहुप्रतीक्षित आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ ची स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सुरुवातीला ही स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती. त्यानंतर ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलँड यांच्यात शारजाह येथे होणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ६ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. सेमीफायनलपूर्वी भारताला एकूण चार सामने खेळायचे आहेत.
भारतीय महिला संघ त्यांचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी कट्ट्रर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत त्यांचा तिसरा श्रीलंकेविरुद्ध ९ ऑक्टोबर रोजी आहे.भारत साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना १३ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येकी संघाला चार पैकी तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. भारताच्या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड यांसारख्या बलाढ्य संघाचा समावेश असल्याने भारतासमोर मोठे आव्हान असेल. या स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
३ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड (शारजा)
३ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (शारजा)
४ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (दुबई)
५ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड (शारजा)
५ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (शारजा)
६ ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड (दुबई)
७ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (शारजा)
८ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (शारजा)
९ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड (दुबई)
१० ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज (शारजा)
११ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
१२ ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (शारजा)
१२ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दुबई)
१३ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड (शारजा)
१४ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (दुबई)
१५ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (दुबई)
१७ ऑक्टोबर : उपांत्य फेरी १ (दुबई)
१८ ऑक्टोबर : उपांत्य फेरी २ (शारजाह)
२० ऑक्टोबर : फायनल (दुबई)