ICC test rankings : विराट कोहलीला जोरदार धक्का! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच टॉप २० मधून बाहेर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ICC test rankings : विराट कोहलीला जोरदार धक्का! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच टॉप २० मधून बाहेर

ICC test rankings : विराट कोहलीला जोरदार धक्का! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच टॉप २० मधून बाहेर

Nov 06, 2024 06:07 PM IST

Virat kohli in ICC Test ranking : आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीनं विराट कोहलीला जोरदार धक्का दिला आहे. कोहली हा पहिल्यांदाच टॉप ट्वेंटीमधून बाहेर फेकला गेला आहे.

ICC test rankings : विराट कोहलीला मोठा झटका! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच टॉप २० मधून बाहेर
ICC test rankings : विराट कोहलीला मोठा झटका! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच टॉप २० मधून बाहेर

ICC Test Cricket Ranking : नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीनं भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा धक्का दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या खराब कामगिरीमुळं कोहली फलंदाजी क्रमवारीत अव्वल-२० मधून बाहेर फेकला गेला आहे. विराट टॉप २० फलंदाजांच्या यादीतून बाहेर फेकली जाण्याची २०१४ नंतरची ही पहिलीच वेळ आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटनं केवळ एकदाच ७० धावांपर्यंत मजल मारली. संपूर्ण मालिकेत त्यानं केवळ ९३ धावा केल्या. त्याचा फटका त्याला क्रमवारीत बसला आहे. कसोटी क्रिकेटमधील पुरुष फलंदाजांच्या ICC क्रमवारीत तो आता २२ व्या स्थानी घसरला आहे.

रोहित शर्मा २६ व्या स्थानी

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताला घरच्या मैदानावर ३-० नं पराभूत करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला आहे. भारताचे दोन्ही स्टार फलंदाज विराट आणि रोहित शर्मा या मालिकेत फ्लॉप ठरले. कर्णधार असलेल्या रोहितच्या बॅटमधूनही धावा आल्या नाहीत. आयसीसी क्रमवारीत त्याचं स्थानही घसरला असून तो २६व्या स्थानी गेला आहे.

आयसीसी रँकिंगमध्ये नंबर वन कोण?

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट कसोटीत फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. त्यानं पाकिस्तान दौऱ्यावर द्विशतक झळकावलं. रूटनंतर केन विल्यमसन आणि हॅरी ब्रूक यांचा क्रमांक लागतो. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याचं स्थानही एका क्रमांकानं घसरलं असून तो चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यानं मात्र प्रगती केली आहे. तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. शुभमन गिल १६ व्या स्थानावर आहे.

गोलंदाजांमध्ये कोण सरस?

भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने ताज्या क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थान गाठलं आहे. रविचंद्रन अश्विन पाचव्या स्थानावर आहे. जडेजानं न्यूझीलंडविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. कसोटी गोलंदाजांच्या यादीत वॉशिंग्टन सुंदर सात स्थानांनी पुढं येऊन ४६ व्या स्थानावर आहे, तर एजाज पटेल २२ व्या स्थानी आहे. ईश सोधी यानंही सुधारणा करत ७० वा क्रमांक पटकावला आहे.

Whats_app_banner