ICC Test Batting Rankings : ऋषभ पंत-जैस्वालची मोठी घसरण, तर हॅरी ब्रुक- कामिंदू मेंडिसची मोठी झेप, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ICC Test Batting Rankings : ऋषभ पंत-जैस्वालची मोठी घसरण, तर हॅरी ब्रुक- कामिंदू मेंडिसची मोठी झेप, पाहा

ICC Test Batting Rankings : ऋषभ पंत-जैस्वालची मोठी घसरण, तर हॅरी ब्रुक- कामिंदू मेंडिसची मोठी झेप, पाहा

Dec 25, 2024 05:46 PM IST

Latest ICC Test Batting Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंत सहाव्या स्थानावर होता, मात्र आता तो 11व्या स्थानावर घसरला आहे.

ICC कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ, ऋषभ पंत-जैस्वालची मोठी घसरण, तर हॅरि ब्रुकची मोठी झेप
ICC कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ, ऋषभ पंत-जैस्वालची मोठी घसरण, तर हॅरि ब्रुकची मोठी झेप

ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना ऋषभ पंत याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण या यष्टीरक्षक फलंदाजाने पहिल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये चाहत्यांची निराशा केली आहे. ऋषभ पंत या मालिकेतील ५ डावात आतापर्यंत केवळ ९६ धावा करू शकला आहे. 

त्याचवेळी, आता ऋषभ पंतला आयसीसी क्रमवारीत याचा फटका सहन करावा लागला आहे. वास्तविक ऋषभ पंत टॉप-१० फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंत सहाव्या स्थानावर होता, मात्र आता तो ११व्या स्थानावर घसरला आहे.

टॉप १० मध्ये केवळ एकच भारतीय

यशस्वी जैस्वाल हाच ICC कसोटी क्रमवारीत टॉप-१० मधील एकमेव भारतीय फलंदाज आहे. या मालिकेची सुरुवात यशस्वी जैस्वालने धमाकेदारपणे केली होती. त्याने पहिल्या कसोटीत शतक झळकावून टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र त्यानंतर तो सतत फ्लॉप होत आहे.

पर्थ कसोटीनंतर यशस्वी जैस्वालने अनुक्रमे ४५, ०, २४, ४ आणि ४ धावा केल्या आहेत. तथापि, या फ्लॉप शोनंतरही, यशस्वी जैस्वाल ८०५ रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम आहे.

जो रूट नंबर वन

त्याचबरोबर इंग्लंडचा जो रूट सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. रुटच्या खात्यात ८९५ रेटिंग गुण आहेत. यानंतर इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूक ८७६ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८६७ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये धावा करणारा कांगारू फलंदाज ट्रॅव्हिस हेड चौथ्या क्रमांकावर आहे. ट्रॅव्हिस हेडचे ८२५ रेटिंग गुण आहेत. भारताचा यशस्वी जैस्वाल ८०५ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. 

यानंतर श्रीलंकेचा कामेंदू मेंडिस, दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, पाकिस्तानचा सौद शकील आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे अनुक्रमे टॉप-१० मध्ये आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या