Harry Brook : २५ वर्षांच्या हॅरी ब्रुकनं जो रूटला मागे टाकलं तर सचिनची बरोबरी केली, कसोटीत घडला मोठा पराक्रम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Harry Brook : २५ वर्षांच्या हॅरी ब्रुकनं जो रूटला मागे टाकलं तर सचिनची बरोबरी केली, कसोटीत घडला मोठा पराक्रम

Harry Brook : २५ वर्षांच्या हॅरी ब्रुकनं जो रूटला मागे टाकलं तर सचिनची बरोबरी केली, कसोटीत घडला मोठा पराक्रम

Dec 13, 2024 11:36 AM IST

Harry Brook And Joe Root In Test Rankings : हॅरी ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक झळकावून त्याने कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

Harry Brook : २५ वर्षांच्या हॅरी ब्रुकनं जो रूटला मागे टाकलं तर सचिनची बरोबरी केली, कसोटीत घडला मोठा पराक्रम
Harry Brook : २५ वर्षांच्या हॅरी ब्रुकनं जो रूटला मागे टाकलं तर सचिनची बरोबरी केली, कसोटीत घडला मोठा पराक्रम (AP)

इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याने आपल्या शानदार कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. ब्रूकने वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपले आठवे कसोटी शतक झळकावले.

यासह, त्याने त्याचा अनुभवी सहकारी आणि महान फलंदाज जो रूट याला मागे टाकले आणि आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान गाठले. वर्ष २०२४ संपण्यापूर्वी हॅरी ब्रूकने ८९८ गुणांसह ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ICC च्या सर्वकालीन क्रमवारीत अनेक दिग्गजांना मागे टाकले

आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी फलंदाजी क्रमवारीत हॅरी ब्रूक ८९८ गुणांसह ३४व्या क्रमांकावर आहे. पण त्याने अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. यात अँडी फ्लॉवर ८९५ गुण, स्टीव्ह वॉ ८९५ गुण, राहुल द्रविड ८९२ गुण, महेला जयवर्धने ८८३ गुण, ग्रेग चॅपेल ८८३ गुण यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

ब्रूकने सचिनची बरोबरी केली

आयसीसीच्या ऑल-टाइम टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये सचिन तेंडुलकरसह हॅरी ब्रूक ३४व्या क्रमांकावर आहे. दोघांचे ८९८ गुण आहेत. हॅरी ब्रूकने १० डिसेंबर २०२४ रोजी न्यूझीलंडविरुद्ध या गुणांची कमाई केली. सचिन तेंडुलकरने २५ फेब्रुवारी २००२ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध ८९८ गुण मिळवले होते.

ब्रुक विराट कोहलीपासून खूप दूर

आयसीसीच्या ऑल-टाइम टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये विराट कोहली ११व्या क्रमांकावर आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीचे ९३७ गुण आहेत. कोहलीने २२ ऑगस्ट २०१८ रोजी इंग्लंडविरुद्ध हे गुण मिळवले होते.

डॉन ब्रॅडमन अव्वल

ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन आयसीसीच्या आयसीसीच्या ऑल-टाइम टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. त्यांचे फलंदाजीचे रेटिंग ९६१ गुण होते. ब्रॅडमन यांनी १० फेब्रुवारी १९४८ रोजी भारताविरुद्ध हे गुण मिळवले होते.

हॅरी ब्रूकची कसोटी कारकीर्द

२५ वर्षीय हॅरी ब्रूकची परदेशी भूमीवरची कामगिरी त्याला इतर फलंदाजांपेक्षा वेगळी ठरवते. परदेशात त्याची कसोटी सरासरी ८९.३५ आहे, जी त्याच्या घरच्या ३८.०५ च्या सरासरीपेक्षा खूप चांगली आहे. ब्रूकने २३ कसोटी सामन्यात ६१.६२ च्या सरासरीने २२८० धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या