Sanju Samson : संजू सॅमसनच्या यशाची नवी भरारी, करिअरमध्ये पहिल्यांदाच गाठलं हे मानाचं स्थान
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : संजू सॅमसनच्या यशाची नवी भरारी, करिअरमध्ये पहिल्यांदाच गाठलं हे मानाचं स्थान

Sanju Samson : संजू सॅमसनच्या यशाची नवी भरारी, करिअरमध्ये पहिल्यांदाच गाठलं हे मानाचं स्थान

Nov 20, 2024 11:09 PM IST

Sanju Samson In ICC T20 Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 क्रमवारीत संजू सॅमसन याने आपले आतापर्यंतचे सर्वकालीन सर्वोत्तम स्थान गाठले आहे. त्याने १७ स्थानांची झेप घेत २२वे स्थान गाठले आहे.

Sanju Samson : संजू सॅमसनच्या यशाची नवी भरारी, करिअरमध्ये पहिल्यांदाच गाठलं हे मानाचं स्थान
Sanju Samson : संजू सॅमसनच्या यशाची नवी भरारी, करिअरमध्ये पहिल्यांदाच गाठलं हे मानाचं स्थान (AFP)

संजू सॅमसन सध्या त्याच्या क्रिकेट करिअरच्या सुवर्ण टप्प्यातून जात आहे. अलीकडेच, त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये बॅक टू बॅक दोन शतके झळकावली आहेत. मात्र, या दरम्यान तो दोनदा शून्यावरही बाद झाला आहे. 

पण आता संजूने आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-20 क्रमवारीत विशेष स्थान मिळवले आहे. या स्थानाला त्याने यापूर्वी कधीही स्पर्श केला नव्हता. तो सध्या त्याच्या सर्वकालीन उच्च स्थानावर आहे.

ICC टी-20 क्रमवारीत संजू सॅमसनची मोठी झेप 

ICC ने जाहीर केलेल्या टी-20 च्या ताज्या क्रमवारीत संजू सॅमसनने यावेळी मोठी झेप घेतली आहे. त्याने १७ स्थानांची झेप घेत थेट २२ वे स्थान पटकावले आहे. सध्या त्याचे रेटिंग पॉइंट्स ५९८ आहेत, जे गाठण्यात तो पहिल्यांदाच यशस्वी झाला आहे. 

काही दिवसांपूर्वीपर्यंत संजूचे भारतीय संघातील स्थान निश्चित नव्हते, परंतु दरम्यानच्या काळात मिळालेल्या संधींचा फायदा उठवत त्याने भरपूर धावा केल्या.  भविष्यातही संजूची बॅट अशीच चालली तर तो क्रमवारीत आणखीन उंच भरारी घेऊ शकतो

संजूने आफ्रिकेविरुद्ध दोन शतके झळकावली

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात संजू सॅमसनने शानदार १०७ धावा केल्या होत्या. यानंतर तो दोनदा शुन्यावर बाद झाला. मात्र मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने पुन्हा १०९ धावांची नाबाद खेळी खेळली आणि वर्चस्व गाजवले. 

आता संजू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळ संघाकडून खेळताना दिसणार आहे, तिथेही त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे.

यावर्षा भारतासाठी सर्वाधिक टी20 धावा करणारा फलंदाज

संजू सॅमसन या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. २०२४ मध्ये त्याने १३ सामन्यांच्या १२ डावात ४३६ धावा केल्या आहेत. यात त्याला ३ शतके आणि एक अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. त्याची सरासरी ४३.६० आहे आणि तो १८०.१६ च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे. विशेष म्हणजे या वर्षी तो ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

Whats_app_banner