IND vs PAK New York Pitch : न्यूयॉर्कच्या पीचवरून राडा! भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीचवर बदलणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK New York Pitch : न्यूयॉर्कच्या पीचवरून राडा! भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीचवर बदलणार? जाणून घ्या

IND vs PAK New York Pitch : न्यूयॉर्कच्या पीचवरून राडा! भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीचवर बदलणार? जाणून घ्या

Jun 07, 2024 05:26 PM IST

IND vs PAK T20 World Cup 2024 : नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियम हे तेच स्टेडियम आहे, ज्याच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या मुद्द्यावर मौन सोडले आहे.

IND vs PAK New York Pitch : न्यूयॉर्कच्या पीचवरून राडा! भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीचवर बदलणार? जाणून घ्या
IND vs PAK New York Pitch : न्यूयॉर्कच्या पीचवरून राडा! भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीचवर बदलणार? जाणून घ्या

IND vs PAK T20 new york poor pitch :  टी-20 विश्वचषक २०२४ चा बहुचर्चित सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. हा सामना रविवारी (९ जून) संध्याकाळी होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल.

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव केला होता. तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

दरम्यान, नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियम हे तेच स्टेडियम आहे, ज्याच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या मुद्द्यावर मौन सोडले आहे.

गोलंदाजीना मिळणाऱ्या असामान्य उसळी आणि मुव्हमेंटमुळे या मैदानावर फलंदाजी करणे खूप कठीण आहे. पण आता पुढील सामन्यांसाठी चांगल्या खेळपट्ट्या देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आयसीसीने दिले आहे.

आयसीसीने निवेदन जारी केले

आयसीसीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टीचे वर्तन आमच्या अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. हे जागतिक दर्जाचे मैदान विकसित करण्यासाठी मैदानाच्या संघाने खूप मेहनत घेतली आहे. उद्याचा सामना पाहिल्यानंतर परिस्थितीची तपासणी केली जाईल आणि पुढील सामन्यांसाठी चांगली खेळपट्टी तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

फलंदाज १०० धावाही करू शकले नाहीत

न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर २०२४ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत २ सामने खेळले गेले आहेत. या मैदानावरील पहिला सामना ३ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झाला होता. त्या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या श्रीलंकेचा संघ केवळ ७७ धावांवरच मर्यादित राहिला. ही एक सोपी धावसंख्या आहे असे दिसते, परंतु दक्षिण आफ्रिकेला हे लक्ष्या गाठण्यासाठी १७ षटके खेळावी लागली.

यानंतर भारत विरुद्ध आयर्लंड सामना ५ जून रोजी नासाऊ स्टेडियमवर झाला. या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या आयर्लंडचा संघ ९६ धावा करून सर्वबाद झाला. भारत सध्या टी-20 फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन संघ आहे, ९७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Whats_app_banner