IND vs AUS Test : सॅम कॉन्स्टासला धक्का मारला, विराटला काय शिक्षा मिळणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS Test : सॅम कॉन्स्टासला धक्का मारला, विराटला काय शिक्षा मिळणार? जाणून घ्या

IND vs AUS Test : सॅम कॉन्स्टासला धक्का मारला, विराटला काय शिक्षा मिळणार? जाणून घ्या

Dec 26, 2024 10:58 AM IST

Virat Kohli vs Sam Konstas : मेलबर्न कसोटीत विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद झाला. याप्रकरणी आता विराटला शिक्षा होऊ शकते.

IND vs AUS Test : सॅम कॉन्स्टासला धक्का मारला, विराटला काय शिक्षा मिळणार? जाणून घ्या
IND vs AUS Test : सॅम कॉन्स्टासला धक्का मारला, विराटला काय शिक्षा मिळणार? जाणून घ्या (AP)

मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद झाला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, त्यानंतर पंचांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले.

पण सॅम कॉन्स्टन्सला धक्का मारल्याप्रकरणी आयसीसी विराटला शिक्षा देऊ शकते. आयसीसीचा कोणता नियम आहे, ज्या अंतर्गत कोहलीला दोषी ठरवले जाऊ शकते ते येथे जाणून घेऊया.

सगळ्यात आधी जाणून घेऊया मैदानावर काय झालं? वास्तविक, जसप्रीत बुमराह डावाच्या ११ व्या षटकात गोलंदाजी करत होता. पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियन स्टार सॅम कॉन्स्टास वेगाने धावा करत होता. कॉन्स्टास बुमराहच्या चेंडूंवरही मोठे फटके मारत होता.

हे षटक संपल्यानंतर विराट दुसऱ्या एंडकडे जात असताना त्याने सॅम कॉन्स्टासला खांद्याने धक्का दिला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. अशा स्थितीत दुसरा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि पंचांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले. आता या प्रकरणी विराटला शिक्षा होऊ शकते, असे बोलले जात आहे.

आयसीसीचा नियम काय म्हणतो?

आयसीसीच्या नियमांच्या अनुच्छेद २.१ मध्ये असे म्हटले आहे की एखाद्या खेळाडूने खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच, सामनाधिकारी किंवा मैदानावरील इतर कोणत्याही व्यक्तीशी अनुचित शारीरिक इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते.

क्रिकेटच्या इतिहासात याआधीही अशा घटना घडल्या आहेत आणि इतिहास पाहिला तर कोहलीला एका सामन्याची बंदी किंवा निलंबनासारखी कोणतीही शिक्षा झालेली नाही. तथापि, सामनाधिकारी निश्चितपणे त्याच्या सामना शुल्कात कपात करू शकतात किंवा शिक्षा म्हणून डिमेरिट गुण देऊ शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या