नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आयसीसीने (ICC) क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आयसीसीने सर्वात मोठा निर्णय स्टंपिंगसाठीच्या व्हिडीओ रिव्ह्यूबाबत घेतला आहे. या स्टंपिंग व्हिडीओ रिव्ह्यूचा फायदा विकेटकीपर घेत होते. आताह तो फायदा विकेटकीपर घेऊ शकणार नाहीत.
वास्तविक, नव्या नियमानुसार विकेटकीपरने स्टंपिंगसाठी अपील केली असेल तर केवळच स्टंपिंगचाच रिप्ले पाहिला जाणार आहे आणि यातूनच फलंदाज स्टंपिंग बाद आहे की नाही हे पाहिले जाईल.
यापूर्वी, विकेटकीपरने स्टंपिंगची अपील केल्यानंतर थर्ड अंपायर चेंडू बॅटला लागला की नाही, हेही पाहायचे. जर चेंडू बॅटला लागून विकेटकीपरच्या हाताता गेला असेल, तर फलंदाज झेलबाद व्हायचा, पण आता तसे होणार नाही.
उदाहरणार्थ- गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी याने मुद्दाम अनेकदा स्टंपिंगची अपील केली. यानंतर अंपायर जेव्हा स्टंपिंगचा रिप्ले पाहायचे तेव्हा चेंडू बॅटला लागला की नाही, हेही पाहायचे.
यामुळे ऑस्ट्रेलियाचे डीआरएस वाचायचे, त्यांना चेंडू बॅटला लागला की नाही हे पाहायला वेगळा डीआरएस घ्यायची गरज लागली नाही. विकेटकीपरची ही ट्रिक आता चालणार नाही. नवीन नियमानुसार स्टंपिंगच्या अपीलवेळी केवळ स्टंपिंगचाच व्हिडीओ पाहिला जाणार आहे.
संबंधित बातम्या