चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. ७ संघांचे सामने पाकिस्तानात होणार आहेत. तर भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.
पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासावर नजर टाकली तर आतापर्यंत एकूण ७ संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. चला तर मग जाणून घेऊया भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी किती वेळा जिंकली आहे.
एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली हे आजच्या क्रिकेट चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. त्या वर्षी टीम इंडियाने पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचा पराभव करून ब गटात पहिले स्थान पटकावले होते.
त्यानंतर उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर भारताचा अंतिम सामना इंग्लंडशी सामना झाला. त्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाने ५ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला होता.
टी-20 वर्ल्डकप २००७ आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताती ही तिसरी ICC ट्रॉफी होती.
२०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वांना माहीत आहे. पण टीम इंडियाने २००२ मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
त्या वर्षी भारत आणि श्रीलंकेने स्पर्धेवर वर्चस्व गाजवले होते आणि अंतिम फेरी गाठली. पण त्यांच्यातील विजेतेपदाची लढत आणखी एका कारणाने संस्मरणीय झाली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना अंतिम सामना २९ सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये खेळवला गेला होता. या सामन्यात प्रथम खेळताना श्रीलंकेने २४४ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात टीम इंडिया फक्त २ षटकेच खेळू शकली, त्यानंतर मुसळधार पावसामुळे अंतिम सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला.
अंतिम सामना ३० सप्टेंबर रोजी पुन्हा खेळवण्यात आला, ज्यामध्ये श्रीलंकेला प्रथम खेळताना २२२ धावा केल्या. पावसाने पुन्हा अडथळा आणला तेव्हा टीम इंडियाने केवळ ८.४ षटके खेळली होती. त्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही.
अशा स्थितीत भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्रॉफी जिंकली होती.
संबंधित बातम्या