चॅम्पियन्स ट्रॉफी वनडेऐवजी टी-20 फॉरमॅटमध्ये होणार? BCCI आणि PCB यांच्यात वादात नवा ट्विस्ट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  चॅम्पियन्स ट्रॉफी वनडेऐवजी टी-20 फॉरमॅटमध्ये होणार? BCCI आणि PCB यांच्यात वादात नवा ट्विस्ट

चॅम्पियन्स ट्रॉफी वनडेऐवजी टी-20 फॉरमॅटमध्ये होणार? BCCI आणि PCB यांच्यात वादात नवा ट्विस्ट

Dec 12, 2024 08:11 AM IST

ICC Champions Trophy 2025 News : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही स्पर्धा वनडेऐवजी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाऊ शकते असे सांगण्यात आले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी वनडेऐवजी टी-20 फॉरमॅटमध्ये होणार? BCCI आणि PCB यांच्यात वादात नवा ट्विस्ट
चॅम्पियन्स ट्रॉफी वनडेऐवजी टी-20 फॉरमॅटमध्ये होणार? BCCI आणि PCB यांच्यात वादात नवा ट्विस्ट

ICC Champions Trophy 2025 in T20 Format : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. १९ फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती आहे, परंतु अधिकृत वेळापत्रक अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही.

या दरम्यानच, एक धक्कादायक बातमी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये ही स्पर्धा वनडे ऐवजी टी-20 फॉरमॅट खेळवली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्पर्धेचे वेळापत्रक १०० दिवस अगोदर जाहीर व्हायला हवे होते. जर चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार असेल तर त्याचे वेळापत्रक १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जाहीर व्हायला हवे होते. परंतू भारताने पाकिस्तानात जायला नकार दिल्याने वेळापत्रकाला विलंब होत आहे.

खरे तर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला आहे. या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलबाबतही चर्चा सुरू आहे. आता वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच स्पर्धेचे सामने नक्की कुठे होणार हे कळेल.

ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये होऊ शकते

क्रिकबझच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद आजपर्यंत म्हणजे ११ डिसेंबरपर्यंत सोडवला जाऊ शकला नाही. आपण आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पासून फक्त ७५ दिवस दूर आहोत आणि संबंधितांना भीती आहे की लवकरच कोणताही तोडगा निघणार नाही. त्यामुळे मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. दीर्घकाळ एकदिवसीय स्वरूपात होणारी ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये बदलली जाऊ शकते.

तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे काही नवीन नाही.कारण याआधीही चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील आवृत्तीपासून टी-20 फॉरमॅटमध्येच होणार असल्याचे वृत्त आले होते, परंतु BCCI-PCB वादामुळे ती पुढील वर्षीच होऊ शकते.

मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता ही स्पर्धा कोणत्या फॉरमॅटमध्ये होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या