Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी असू शकते टीम इंडिया, मोहम्मद शमी-श्रेयस अय्यरसह या खेळाडूंना संधी मिळणार?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी असू शकते टीम इंडिया, मोहम्मद शमी-श्रेयस अय्यरसह या खेळाडूंना संधी मिळणार?

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी असू शकते टीम इंडिया, मोहम्मद शमी-श्रेयस अय्यरसह या खेळाडूंना संधी मिळणार?

Dec 22, 2024 06:58 PM IST

India Squad Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळू शकते? हे आपण जाणून घेणार आहोत.

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी असू शकते टीम इंडिया, मोहम्मद शमी-श्रेयस अय्यरसह या खेळाडूंना संधी मिळणार?
Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी असू शकते टीम इंडिया, मोहम्मद शमी-श्रेयस अय्यरसह या खेळाडूंना संधी मिळणार? (PTI)

Team India For Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २२०५ साठी हायब्रीड मॉडेलला मान्यता देण्यात आली आहे, परंतु अद्याप आयसीसीच्या या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. भारत आपले सर्व सामने दुबईत खेळण्याची शक्यता आहे. तर स्पर्धेतील बाकीचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, हे निश्चित झाले आहे.

अलीकडेच इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला आहे, मात्र यादरम्यान सर्वांच्या नजरा भारतीय संघाकडे आहेत. ही स्पर्धा उपखंडात खेळवली जात असल्याने टीम इंडियाला विशेषत: गोलंदाजीत फिरकी आणि वेगवान गोलंदाजीचा चांगला मेळ तयार करावा लागणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असल्याने रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीची जबाबदारी सांभाळू शकतात. रोहित त्याच्या कारकिर्दीतील ११ हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे.

दुसरीकडे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये गिलची सरासरी ५८.२० आहे. टीम इंडियाला बॅकअप ओपनिंग बॅट्समनची गरज असेल तर केएल राहुलकडे पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते.

मधल्या फळीवर नजर टाकली तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो, पण पाचव्या क्रमांकावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. या वर्षी श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियात पुनरागमन केले होते. तो ५ व्या क्रमांकावर खेळताना दिसला होता. 

तसेच, अलीकडेच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ९ सामन्यात ३४५ धावा केल्या होत्या, तर विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्याने ५५ चेंडूत ११४ धावांची नाबाद खेळी करून खळबळ उडवून दिली होती.

वेगवान अष्टपैलू खेळाडूसाठी हार्दिक पांड्या हा पहिला पर्याय असेल, तर फिरकी अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजाचे संघात स्थान जवळपास निश्चित आहे. 

गोलंदाजी विभागावर नजर टाकल्यास जडेजा व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनाही संघात स्थान दिले जाऊ शकते, परंतु मॅनेजमेंटला परिस्थितीनुसार प्लेइंग इलेव्हन संयोजन तयार करावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा भारतीय संघाला असेल. शमी २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने केवळ ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या होत्या. त्याच्यासोबत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांचीही वेगवान गोलंदाजीमध्ये निवड होऊ शकते.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल/संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Whats_app_banner

संबंधित बातम्या