ICC Champions Trophy 2025 Indian Team : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला अगदी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या स्क्वाडबाबत उत्कुता निर्माण झाली आहे.
अशा स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ कधी जाहीर होणार याबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत.
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सर्व संघांना १२ जानेवारीपर्यंत १५ सदस्यीय तात्पुरत्या स्वरुपातील संघाची घोषणा करावी लागणार आहे. तथापि, संघ १३ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करू शकतात. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत आता टीम इंडिया आपला संघ कधी जाहीर करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया घरच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत ५ टी-20 आंतरराष्ट्रीय आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
ही मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. आधी टी-20 सामने खेळवले जातील. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची एकदिवसीय मालिका असेल, ज्याद्वारे संघ स्पर्धेसाठी तयारी करू शकेल.
याआधीची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये खेळली गेली होती. त्या स्पर्धेत टीम इंडियाला विजेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत यावेळी टीम इंडिया टूर्नामेंट जिंकेल अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या