मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Final : अरे देवा! ही तर सर्वात मोठी ‘पनौती’, टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा भंगणार की काय? जाणून घ्या

IND vs SA Final : अरे देवा! ही तर सर्वात मोठी ‘पनौती’, टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा भंगणार की काय? जाणून घ्या

Jun 28, 2024 06:31 PM IST

IND vs SA Final Umpire : टीम इंडिया गेल्य १० वर्षांपासून आयसीसी स्पर्धा जिंकू शकलेली नाही. भारतीय संघ सातत्याने नॉक-आऊटमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर जात आहे.

IND vs SA Final : अरे देवा! ही तर सर्वात मोठी पनौती, टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा भंगणार की काय? जाणून घ्या
IND vs SA Final : अरे देवा! ही तर सर्वात मोठी पनौती, टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा भंगणार की काय? जाणून घ्या

टी-20 विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना (२९ जून) बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ही विजेतेपदाची लढत शनिवारी होणार आहे. 

दरम्यान, टीम इंडिया गेल्य १० वर्षांपासून आयसीसी स्पर्धा जिंकू शकलेली नाही. भारतीय संघ सातत्याने नॉक-आऊटमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

टीम इंडियासाठी 'अनलकी' पंच

२०२१ चा टी-20 वर्ल्डकप वगळता टीम इंडियाने गेल्या १० वर्षात प्रत्येक आयसीसी इव्हेंटची उपांत्य फेरी किंवा अतिम फेरी गाठली आहे. पण टीम इंडियाला ट्रॉफी जिंकण्यात सातत्याने अपयश आले आहे.

विशेष म्हणजे, टीम इंडियाच्या या सर्व सामन्यांमध्ये रिचर्ड केटलबरो हे अंपायर होते. २०१९ आणि २०१५ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही हेच रिचर्ड केटलबरो पंच म्हणून कार्यरत होते. रिचर्ड केटलबरो हे टीम इंडियासाठी अनलकी पंच ठरले आहेत. 

भारत-आफ्रिका फायनलमध्ये रिचर्ड केटलबरो अंपायर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 विश्वचषक २०२४ च्या मॅच ऑफिशियल्सची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंडचे पंच रिचर्ड केटलबरो यांचेही नाव आहे. ब्रिजटाऊन येथे होणाऱ्या सामन्यादरम्यान ते तिसऱ्या पंचाची भूमिका बजावणार आहेत. सध्या रिचर्ड केटलबरो हे सर्वात अनुभवी पंचांपैकी एक आहेत. 

केटलबरो यांनी आतापर्यंत ११५ कसोटी, १६४ एकदिवसीय आणि ५८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे.

मैदानावरील पंचाच्या भूमिकेत कोण असेल?

न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मैदानी पंच म्हणून काम पाहतील. ऑस्ट्रेलियाचे रॉड टकर हे चौथे पंच असतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीत ख्रिस गॅफनी हे मैदानावरील पंच होते. गॅफनी आतापर्यंत १८९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मैदानी पंच म्हणून काम केले आहे. ६० वर्षीय इलिंगवर्थ यांना ३०० हून अधिक सामन्यांचा अनुभव आहे.

दोन्ही संघ चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी भिडतील

दक्षिण आफ्रिका जगातील बलाढ्य संघांपैकी एक आहे. पण आफ्रिकेला अद्याप आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे जेतेपद जिंकता आलेले नाही. ३२ वर्षांपासून विश्वचषक खेळत असलेला दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे भारतीय संघाची स्थितीही चांगली नाही. दक्षिण आफ्रिकेसोबतच टीम इंडियालाही गेल्या दशकापासून चोकर्स म्हणून चिडवले जात आहे. दोन्ही संघ चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी भिडतील.

 

WhatsApp channel