भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला, तर ९ मार्चला फायनल; असं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचं संभाव्य वेळापत्रक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला, तर ९ मार्चला फायनल; असं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचं संभाव्य वेळापत्रक

भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला, तर ९ मार्चला फायनल; असं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचं संभाव्य वेळापत्रक

Dec 22, 2024 11:09 AM IST

Champions Trophy 2025 Full Schedule : चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे सामने दुबईत होणार आहेत. पण याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला, तर ९ मार्चला फायनल; असं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचं संभाव्य वेळापत्रक
भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला, तर ९ मार्चला फायनल; असं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचं संभाव्य वेळापत्रक

ICC 2025 Champions Trophy Full Schedule : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेला सुरुवात होण्यास दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे, परंतु या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. या वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारी रोजी सामना होणार आहे.

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे. आयसीसीकडून या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाल्यावर टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्तानच्या सर्व प्रयत्नांनंतरही भारताने सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाला तिथे पाठवण्यास नकार दिला.

अशा स्थितीत आता ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. मात्र, पाकिस्तानने काही अटींसह भारताची हायब्रीड मॉडेल ऑफर स्वीकारली.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. टीम इंडिया २० फेब्रुवारीला बांगलादेश, २३ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि २ मार्चला न्यूझीलंडला भिडणार आहे. 

तर पाकिस्तानचा संघ १९ फेब्रुवारीला न्यूझीलंडशी, २३ फेब्रुवारीला भारत आणि २७ फेब्रुवारीला बांगलादेशला भिडणार आहे.

टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळणार 

चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाईल. म्हणजे टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळणार, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला तर भारताचा उपांत्य फेरीचा सामना दुबईत होणार आहे.

उपांत्य फेरीनंतर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर विजेतेपदाचा सामनाही दुबईतच होणार आहे. मात्र, टीम इंडिया आपले सामने कुठे खेळणार याचीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आत्तापर्यंत, स्थळ आणि वेळापत्रकाची माहिती केवळ विविध सुत्रांद्वारेच समोर आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या