भारतीय क्रिकेट संघाने नुकताच श्रीलंकेचा दौरा केला. जिथे संघ फक्त ३ टी-20 सामन्यांची आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला. टी-20 मध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. भारताने टी-20 मालिका ३-० ने जिंकली, पण एकदिवसीय मालिकेत यजमान श्रीलंकेने वरिष्ठ भारतीय संघावर वर्चस्व गाजवले. श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत भारताचा २-० असा पराभव केला.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी ही चिंतेची बाब आहे, कारण श्रीलंकेचा संघ भारतापेक्षा कमकुवत होता, तर भारताचे सर्व स्टार खेळाडू या मालिकेत खेळत होते. अशा स्थितीत श्रीलंकेने भारताचा २-० ने पराभव केला.
मात्र, त्याहून चिंतेची बाब म्हणजे भारतीय संघ या वर्षात आता एकही वनडे सामना खेळणार नाही. आता २०२४ मध्ये रोहित सेनेचा एकही वनडे सामना होणार नाही. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी भारताला फारसा वेळ मिळणार नाही.
भारतीय क्रिकेट संघ आता फेब्रुवारी २०२५ मध्ये थेट इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे.
मात्र, त्यानंतर लगेचच पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, भारत पाकिस्तानात जाणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
आता भारतीय संघ आपली पुढील वनडे मालिका थेट फेब्रुवारी २०२५ मध्ये खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीची ही शेवटची वनडे मालिका देखील असेल. अशा स्थितीत आयसीसीच्या मेगा स्पर्धेच्या तयारीसाठी भारताला फारसा वेळ मिळणार नाही.
इंग्लंडविरुद्धच्या त्या ३ वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाला त्यांचे सर्वोत्तम ११ खेळाडू उतरवावे लागतील. त्या ३ सामन्यांमध्ये गौतम गंभीरला त्याची अचूक प्लेइंग इलेव्हन शोधावी लागेल.
विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने गेल्या ११ वर्षांपासून एकही वनडेची ICC स्पर्धा जिंकलेली नाही. भारताने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता यावेळी नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरला ोहा दुष्काळ संपवायचा आहे.