मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Ban : भारत-बांगलादेश सराव सामना फ्रीमध्ये पाहा, भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार मॅच? जाणून घ्या

Ind vs Ban : भारत-बांगलादेश सराव सामना फ्रीमध्ये पाहा, भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार मॅच? जाणून घ्या

Jun 01, 2024 11:01 AM IST

Ind vs Ban warm-up match live streaming : भारतीय संघ आगामी T20 विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी एक सराव सामनाही खेळणार आहे, जो न्यूयॉर्कच्या मैदानावर आज शनिवारी १ जून रोजी बांगलादेश संघाविरुद्ध होणार आहे.

India vs Bangladesh, T20 World Cup 2024 warm-up tie live streaming
India vs Bangladesh, T20 World Cup 2024 warm-up tie live streaming

Ind vs Ban, T20 World Cup 2024 warm-up tie live streaming : टी-20 विश्वचषक २०२४ सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. याआधी २७ जून ते १ जून या कालावधीत सराव सामने खेळवले जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भारत शनिवारी (१ जून) बांगलादेशविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. टी-२० विश्वचषकातील हा शेवटचा सराव सामना असेल. या सराव सामन्यातून टीम इंडिया आपली प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

त्याआधी भारत न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळेल. यामुळे भारतीय संघाला न्यूयॉर्कच्या खेळपट्टीची कल्पना घेण्याची संधीही मिळणार आहे. तसंच रोहित सेनेला आपल्या तयारीची चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे.

भारत वि. बांगलादेश सराव सराव कुठे होणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत वि. बांगलादेश सराव सामना कधी सुरू होईल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होईल आणि सामना रात्री ८:०० वाजता सुरू होईल.

भारत वि. बांगलादेश सराव सामना लाईव्ह कसं पाहणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

टी-२० वर्ल्डकप २०२४