How To England qualify for Super 8 : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा २८ वा सामना इंग्लंड आणि ओमान यांच्यात खेळला गेला. शुक्रवारी अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने ओमानचा ३ षटकात धुव्वा उडवला.
जॉस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने ओमानचा १०१ चेंडू राखून दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर या विजयानंतर सुपर-८ फेरीत खेळण्याच्या इंग्लंडच्या आशा कायम राहिल्या आहेत.
प्रथम फलंदाजीला आलेला ओमानचा संघ १३.२ षटकांत ४७ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडने अवघ्या ३.१ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. अशा प्रकारे इंग्लंडला ८ गडी राखून सहज विजय मिळाला, पण या विजयानंतर इंग्लंड सुपर-८ फेरीत पोहोचेल का? असाही प्रश्न कायम आहे.
वास्तविक, ओमानविरुद्धच्या विजयानंतर इंग्लंडचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. आता इंग्लंडचे ३ सामन्यांत ३ गुण झाले आहेत. मात्र, इंग्लंड अजूनही आपल्या गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या गटातून ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच सुपर-८ फेरी गाठली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियानंतर स्कॉटलंड ३ सामन्यांत ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता स्कॉटलंडला ऑस्ट्रेलियाशी, तर इंग्लंडला नामिबियाशी खेळायचे आहे.
स्कॉटलंड ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला आणि नामिबियाविरुद्ध इंग्लंडचा विजय झाला तर दोन्ही संघांचे समान ५-५ गुण असतील.
परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड पुढील फेरीत पोहोचेल. कारण आज इंग्लंडने ओमानविरुद्ध १०१ चेंडू राखून विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंडचा नेट रनरेट तगडा झाला आहे. आता इंग्लंडचा नेट रन रेट +३.०८१ झाला आहे.
त्यामुळे इंग्लंडला केवळ नामिबियाविरुद्धच्या विजयाची गरज आहे. त्याचवेळी स्कॉटलंडसाठी हा मार्ग सोपा असणार नाही. सुपर-८ फेरी गाठण्यासाठी स्कॉटलंडला ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करावे लागेल.
संबंधित बातम्या