IPL 2024 : प्रेक्षक चिडवत असतील तर काय करायचं, स्टीव्ह स्मिथनं हार्दिकला सांगितली आयडिया
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : प्रेक्षक चिडवत असतील तर काय करायचं, स्टीव्ह स्मिथनं हार्दिकला सांगितली आयडिया

IPL 2024 : प्रेक्षक चिडवत असतील तर काय करायचं, स्टीव्ह स्मिथनं हार्दिकला सांगितली आयडिया

Mar 30, 2024 04:31 PM IST

Hardik Pandya IPL 2024 : ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ हार्दिक पंड्याच्या मदतीला धावला आहे. त्याने पंड्याला काही लाखमोलाचे सल्ले दिले आहेत.

प्रेक्षक चिडवत असतील तर काय करायचं, स्टीव्ह स्मिथनं हार्दिकला सांगितली आयडिया
प्रेक्षक चिडवत असतील तर काय करायचं, स्टीव्ह स्मिथनं हार्दिकला सांगितली आयडिया

Steve Smith On Hardik Pandya आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामने गमावले आहेत. पाचवेळचा चॅम्पियन असलेल्या मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तरी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही.

विशेष म्हणजे, मुंबईच्या खराब कामगिरीचे खापर कर्णधार हार्दिक पंड्यावर फोडले जात आहे. आयपीएलच्या दोन महिनेआधी मुंबई इंडिन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कॅप्टन बनवले. पण हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. हार्दिक कर्णधार झाल्यापासून चाहते त्याला सतत ट्रोल करत आहेत.

अशा परिस्थितीत आता ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ हार्दिक पंड्याच्या मदतीला धावला आहे. त्याने पंड्याला काही लाखमोलाचे सल्ले दिले आहेत.

रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्याने क्रिकेट चाहते नाराज झाले होते. यामुळे हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.

'हार्दिकने ट्रोलर्सकडे लक्ष देऊ नये'

आता ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथने हार्दिक पंड्याला प्रेक्षकांनी केलेल्या ट्रोलिंगवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्टीव्ह स्मिथ म्हणाला की मी फक्त म्हणेन की त्याकडे लक्ष देऊ नका, हे सर्व अप्रासंगिक आहे. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे बाहेरच्या कोणालाही माहीत नाही. बाहेरचा कोणीही त्या ड्रेसिंग रूमचा भाग नाही. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच बरे राहील'. 

विशेष म्हणजे, एकदिवसीय विश्वचषक २०१९ दरम्यान, मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथला 'चीटर' म्हटले होते. स्मिथनेही अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना केला आहे.

बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर जगभरातून स्टीव्ह स्मिथला टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर २०१८ मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामाही दिला होता. 

मुंबईचा पुढचा सामना वानखेडे स्टेडियमवर

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. 

मुंबईच्या अशा कामगिरीनंतर चाहते हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावरही सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. 

विशेषत: हार्दिक पांड्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ज्याप्रकारे आपल्या गोलंदाजांचा वापर केला, त्यामुळे तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध १ एप्रिलला होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Whats_app_banner