Champions Trophy Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं कधी मिळणार, किंमत काय असेल? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Champions Trophy Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं कधी मिळणार, किंमत काय असेल? जाणून घ्या

Champions Trophy Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं कधी मिळणार, किंमत काय असेल? जाणून घ्या

Jan 28, 2025 04:17 PM IST

Champions Trophy 2025 Match Tickets : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यासाठी जवळपास ३ आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि यूएई संयुक्तपणे करणार आहेत.

Champions Trophy Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं कधी मिळणार, किंमत काय असेल? जाणून घ्या
Champions Trophy Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं कधी मिळणार, किंमत काय असेल? जाणून घ्या

How to Buy Champions Trophy 2025 Match Tickets : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पाकिस्तान आणि दुबई या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. ज्यामध्ये ८ संघ एकमेकांना भिडणार आहेत.

भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला होणार आहे, पण सर्वात जास्त उत्सुकता २३ फेब्रुवारीला दुबईमध्ये होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची आहे. आयसीसीने तिकीट विक्रीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यांची तिकिटे कधी आणि कुठे मिळतील हे जाणून घ्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकीट कसे खरेदी करावे?

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या गट सामन्यांची आणि दुसऱ्या उपांत्य फेरीची तिकिटे २८ जानेवारी रोजी दुपारी १:०० वाजता (गल्फ स्टँडर्ड टाइम), दुपारी २:०० वाजता (पाकिस्तानी वेळेनुसार) आणि भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वा. उपलब्ध असतील. 

क्रिकेट चाहते आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करू शकतात. यामध्ये नाव, ईमेल, फोन नंबर, जन्मतारीख आणि आवडत्या टीमची माहिती भरावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतर, चाहते तिकीट खरेदी करू शकतात.

भारताच्या सामन्यांची तिकिटे कधी मिळणार?

मात्र, भारताच्या सामन्यांची तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या फक्त पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांची आणि पहिल्या उपांत्य फेरीची तिकिटे उपलब्ध असतील. 

भारताच्या सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तर अंतिम सामन्याची तिकिटे पहिल्या उपांत्य फेरीनंतर उपलब्ध होतील.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ गट

अ गट: पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश

ब गट: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान

भारताचे गट टप्प्यातील सामने

२० फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई

२३ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई

२ मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिकीटांचे दर -

रावळपिंडीत पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या मोठ्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत २००० पाकिस्तानी रुपयांपासून (सुमारे ६२० भारतीय रुपये) सुरू होते. उपांत्य फेरीच्या तिकिटांची किंमत २५०० पाकिस्तानी रुपयांपासून (सुमारे ७७६ भारतीय रुपये) सुरू होते.

ग्रुप स्टेज मॅचसाठी व्हीव्हीआयपी तिकिटे १२००- पाकिस्तानी रुपये (अंदाजे ३७२६ भारतीय रुपये) मध्ये उपलब्ध आहेत, तर सेमीफायनलसाठी व्हीव्हीआयपी तिकिटांची किंमत २५००० पाकिस्तानी रुपये (अंदाजे ७७६४ भारतीय रुपये) आहे. दुबईत होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत लवकरच जाहीर होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या