क्रिकेटमध्ये पंचाची भूमिका खूप महत्वाची असते. पंचांशिवाय कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची कल्पनाही करता येत नाही. चाहते अनेकदा पंचाचा पगार जाणून घेण्यात रस दाखवतात. अशा स्थितीत आपण येथे क्रिकेट सामन्यांमध्ये अंपायरला किती मानधन मिळते? याबाबत जाणून घेणार आहोत. अंपायरच्या पगाराबद्दल सांगणार आहोत.
तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अंपायर बनण्यासाठी काय करावे लागते? हेही आपण येथे जाणून घेणार आहोत.
क्रिकेटचा अंपायर होण्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळलेलेच असावे, याची गरज नाही. मात्र, तुमच्यासाठी क्रिकेट आणि या खेळाच्या नियमांची अचूक माहिती असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली असायला हवी आणि तुमचा फिटनेसही चांगला असायला हवा, कारण संपूर्ण सामन्यादरम्यान अंपायरला मैदानावर उभे राहावे लागते.
सर्वप्रथम तुम्हाला स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करावे लागेल. स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याचा अनुभव तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यानंतर तुम्हाला राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्ही बीसीसीआयमध्ये अंपायर होण्यासाठी पात्र व्हाल.
मात्र, बीसीसीआय अंपायर होण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. भारतीय क्रिकेट मंडळ दरवर्षी स्तर १ ची परीक्षा घेते. यासाठी बीसीसीआय तीन दिवसांचा कोचिंग क्लासही उपलब्ध करून देते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरचा पगार त्याच्या अनुभवावर अवलंबून असतो. हाच नियम एकदिवसीय सामन्यांमध्येही लागू होतो. एलिट पॅनलमध्ये सामील झालेल्या पंचांना प्रति सामन्यासाठी सुमारे ३ हजार डॉलर पगार मिळतो. गेल्या काही वर्षांत पंचांच्या पगारात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, विश्वचषकातील एका सामन्यात पंचाला ५००० डॉलर्सपर्यंतचे मानधन मिळते.
ग्रेड ए मधील पंचांना प्रथम श्रेणीतील सामन्यांसाठी ४० हजार रूयपे प्रति दिन मानधन मिळते. ग्रेड ए मधील पंचांना ३० हजार रूपये मिळतात.
एलिट पॅनलमध्ये सामील झालेल्या पंचांना एकदिवसीय सामन्यासाठी सुमारे २.५ लाख रुपये मिळतात. तसेच, त्यांची वार्षिक सॅलरी ७५ लाखांपर्यंत असते.