T20 Cricket : टी-20 क्रिकेटची सुरुवात कधी झाली? कोणत्या संघांमध्ये झाला पहिला सामना? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 Cricket : टी-20 क्रिकेटची सुरुवात कधी झाली? कोणत्या संघांमध्ये झाला पहिला सामना? जाणून घ्या

T20 Cricket : टी-20 क्रिकेटची सुरुवात कधी झाली? कोणत्या संघांमध्ये झाला पहिला सामना? जाणून घ्या

Dec 17, 2024 04:26 PM IST

T20 Cricket Match History : क्रिकेटमधील नवीन आणि लहान फॉरमॅट म्हणजे टी-20 क्रिकेट. क्रिकेटच्या या फॉरमॅटला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण क्रिकेटचा हा फॉरमॅट कधी आणि कसा सुरू झाला हे फार कमी लोकांना माहीत आहे.

T20 Cricket : टी-20 क्रिकेटची सुरुवात कधी झाले, कोणत्या संघांमध्ये झाला पहिला सामना? जाणून घ्या
T20 Cricket : टी-20 क्रिकेटची सुरुवात कधी झाले, कोणत्या संघांमध्ये झाला पहिला सामना? जाणून घ्या (HT_PRINT)

First T20 Cricket Match History : सध्याच्या काळात टी-20 क्रिकेट खूपच लोकप्रिय झाले आहे. गेल्या दोन दशकांत क्रिकेटच्या या फॉरमॅटने चाहत्यांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमधील लोकप्रियतेमुळे अनेक नवीन देशही या खेळाकडे वळले आहेत आणि त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. 

यात यूएसए आणि अफगाणिस्तान सारख्या संघांचा समावेश आहे, ज्यांनी अलीकडच्या काळात बरीच चर्चा मिळवली आहे. 

क्रिकेटच्या या स्वरूपातील लोकांची आवड लक्षात घेऊन या खेळाला लॉस एंजेलिस ऑलिम्पिक-२०२८ मध्येही स्थान देण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे आगमन झाल्याने या खेळाची लोकप्रियता जगभर पसरणार हे उघड आहे. 

दरम्यान, क्रिकेटचा हा सर्वात लहान फॉरमॅट म्हणजे टी-20 क्रिकेट कधी सुरू झाले आणि कोणत्या दोन संघांमध्ये पहिला सामना खेळला गेला हे तुम्हाला माहीत आहेत का?

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला पहिला टी-20

टी-20 क्रिकेटमधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना १७ फेब्रुवारी २००५ रोजी ऑकलंडमध्ये खेळला गेला. हा सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमावून २१४ धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाने हा सामना ४४ धावांनी जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगने ५५ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून स्कॉट स्टायरिसने ३९ चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी केली पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. 

ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मायकेल कॅस्प्रोविच याने २९ धावांत ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात रिकी पाँटिंगला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

पुरुषांच्या आधी महिलांचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना झाला

पुरुषांपूर्वी महिलांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला गेला. हा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ऑगस्ट २००४ रोजी युनायटेड किंगडम येथील होव्ह येथे खेळला गेला. न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला होता.

आता १०० हून अधिक देश टी-20 क्रिकेट खेळतात

सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामने खेळणाऱ्या देशांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे. तर केवळ १६ देश एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळतात आणि १२ देश कसोटी क्रिकेट खेळतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या