शोएब बशीर बेन स्टोक्सला कसा आणि कुठे सापडला? कशी झाली इंग्लंडच्या संघात एन्ट्री? वाचा रंजक स्टोरी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  शोएब बशीर बेन स्टोक्सला कसा आणि कुठे सापडला? कशी झाली इंग्लंडच्या संघात एन्ट्री? वाचा रंजक स्टोरी

शोएब बशीर बेन स्टोक्सला कसा आणि कुठे सापडला? कशी झाली इंग्लंडच्या संघात एन्ट्री? वाचा रंजक स्टोरी

Feb 01, 2024 10:46 PM IST

Shoaib Bashir India : शोएब बशीर असे फिरकी गोलंदाजाचे नाव आहे. शोएब बशीर हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची शोध आहे. स्टोक्सने दुसऱ्या कसोटीआधी शोएब बशीर त्याला कसा सापडला? हे सांगितले आहे.

Shoaib Bashir
Shoaib Bashir

india vs england 2nd test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना उद्या (शुक्रवारी) २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत दुसऱ्या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे.

मालिकेतील पहिल्या म्हणजेच हैदराबाद कसोटीत भारत आणि इंग्लिश संघाच्या फिरकीपटूंची जादू पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसत होते. अशातच आणखी एक फिरकी गोलंदाजाची इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे.

शोएब बशीर बेन स्टोक्सची शोध

शोएब बशीर असे फिरकी गोलंदाजाचे नाव आहे. शोएब बशीर हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची शोध आहे. स्टोक्सने दुसऱ्या कसोटीआधी शोएब बशीर त्याला कसा सापडला? हे सांगितले आहे. स्टोक्सने बशीरच्या गोलंदाजीने तो कसा प्रभावित झाला याचे वर्णन केले आहे. स्टोक्सने बशीरला सर्वप्रथम सोशल मीडियावरील एका व्हिडीओ क्लिपमध्ये पाहिले होते.

बशीरनं ॲलिस्टर कुकला त्रस्त केलं

खरं तर, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शोएब बशीरने इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकविरुद्ध खूपच चांगली गोलंदाजी केली होती. सोमरसेटकडून खेळताना बशीरने कूकला चांगलेच त्रस्त केले होते. हा व्हिडीओ बेन स्टोक्सने पाहिला आणि त्यानंतर त्याने तो इंग्लंड टीम डायरेक्टर रॉब आणि हेड कोच ब्रेंडन मॅक्क्युलम यांना पाठवला. यानंतर शोएब बशीरचा भारत दौऱ्यासाठी विचार सुरू झाला.

शोएब बशीर ट्विटरवर सापडला

शोएब बशीरबाबत बोलताना स्टोक्स म्हणाला, ‘खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच बशीरला बॉलिंग करताना अबुधाबीमध्ये पाहिलं होतं. यानंतर मी त्याला ट्विटरवर पाहिलं. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याने ॲलिस्टरविरुद्ध खूपच प्रभावी गोलंदाजी केली होती, त्याची एक छोटी क्लिप बनवण्यात आली होती, यामध्ये तो शानदार गोलंदाजी करताना दिसला’.

त्या सामन्यात बशीरला केवळ एकच विकेट मिळाली होती. पण ती गोलंदाजी पाहून स्टोक्सला वाटलं की हा भारतीय पीचेसवर त्याच्या ऑफ-स्पिनसह खूप उपयुक्त ठरू शकतो.

तो म्हणाला, 'आमचा केसी (रॉब की) आणि बज (ब्रेंडन मॅक्युलम) व्हॉट्सॲप ग्रुप आहे. मी बशीरची क्लिप फॉरवर्ड केली आणि म्हणालो, हे बघा, हा भारत दौऱ्यावर आपल्या कामी येऊ शकतो. आणि मग तिथून सर्वकाही सुरू झाले. लायन्स दौऱ्यावर त्याची निवड करण्यात आली. त्यानंतर लायन्सच्या कोचने आम्हाला पुढच्या गोष्टी सांगितल्या"

शोएब बशीरची भारतात बरीच चर्चा

दरम्यान, शोएब बशीरची याआधीच भारतात बरीच चर्चा झाली आहे. कारण व्हिसा, पाकिस्तानी वंश या प्रकरणांमुळे शोएब बशीर भारतीयांना आधीच ठाऊक झाला आहे.

या सर्व अडचणीनंतर अखेर आता शोएब बशीर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दाखल झाला आहे. २० वर्षांचा शोएब बशीर ऑफस्पिनर आहे. त्याला हैदराबाद कसोटीत व्हिसा न मिळाल्याने खेळता आले नव्हते. पण आता शोएब बशीर भारतात पोहोचला असून पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

Whats_app_banner