Pak vs Eng : पहिल्या डावात ५०० धावा करूनही पाकिस्तानचा पराभव कसा झाला? ही ५ कारणं जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pak vs Eng : पहिल्या डावात ५०० धावा करूनही पाकिस्तानचा पराभव कसा झाला? ही ५ कारणं जाणून घ्या

Pak vs Eng : पहिल्या डावात ५०० धावा करूनही पाकिस्तानचा पराभव कसा झाला? ही ५ कारणं जाणून घ्या

Oct 11, 2024 02:59 PM IST

पाकिस्तानचा आधी बांगलादेश आणि आता इंग्लंडकडून पराभव झाल्याने मीडिया आणि माजी क्रिकेटपटूंनी फटकारले आहे. अशा परिस्थितीत, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघाचा पराभव कसा आणि त्याची कारणे काय ते जाणून घेऊया.

Pak vs Eng : पहिल्या डावात ५०० धावा करूनही पाकिस्तानचा पराभव कसा झाला? ही ५ कारणं जाणून घ्या
Pak vs Eng : पहिल्या डावात ५०० धावा करूनही पाकिस्तानचा पराभव कसा झाला? ही ५ कारणं जाणून घ्या (AFP)

पाकिस्तानला मुलतान कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने हॅरी ब्रूकच्या तिहेरी आणि जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर पाकिस्तानी गोलंदाजांची दाणादाण उडवली.

यानंतर पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना अगदी सहज बाद केले.

बाबर आझम सुपर फ्लॉप

इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानला ज्या खेळाडूकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या तो म्हणजे बाबर आझम. इंग्लंडविरुद्धच्या मुलतान कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात बाबर आझमला केवळ ३५ धावा करता आल्या.

बाबर पाकिस्तानसाठी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. घरच्या मैदानावर बाबर आझम धावा करून फॉर्ममध्ये दमदार पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.

बाबर आझमला इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करण्यात आलेले अपयश हे पाकिस्तानला महागात पडले आणि तो या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक ठरला.

शान मसूदची वाईट कॅप्टन्सी

मुलतान कसोटी सामन्यात शान मसूदने पहिल्या डावात नक्कीच शतक झळकावले, पण कर्णधार म्हणून तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. शान मसूदची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याने मुलतानमध्ये अशा पीचची मागणी केली, ज्यावर धावांचा पाऊस पडला.

शान मसूदला इंग्लंडच्या बॅझबॉल स्टाइलचा विसर पडला. पाकिस्तानने १४९ षटकात सर्वबाद ५५६ धावा केल्या. तर इंग्लंडने त्याच पीचवर १५० षटके खेळत ७ बाद ८२३ धावांचा पाऊस पाडला. इंग्लंडला अशी सपाट पीच देणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले.

यादरम्यान शान मसूद मैदानावर पूर्णपणे असहाय्य दिसत होता. इंग्लंडचे फलंदाज वनडे स्टाईल बॅटिंग करत होते, त्यावेळी त्याच्याकडे काहीत प्रत्युत्तर नव्हते.

मोहम्मद रिझवानही ठरला पराभवाचे कारण

मुल्तान कसोटीत पाकिस्तानचा पराभव करणारा मोहम्मद रिझवान तिसरा खलनायक ठरला. रिझवान हा पाकिस्तानचा मधल्या फळीतील सर्वात मजबूत फलंदाजांपैकी एक आहे पण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात रिझवानला आपले खातेही उघडता आले नाही. दुसऱ्या डावातही रिझवान पूर्णपणे फ्लॉप ठरला. मोहम्मद रिझवानच्या खराब फलंदाजीमुळे पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

सॅम अयुब पूर्णपणे फ्लॉप

फ्रँचायझी क्रिकेटमध्ये चमक दाखवणारा टॉप ऑर्डर बॅट्समन सॅम अयुब इंग्लंडविरुद्धच्या मुलतान टेस्टमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. एकीकडे खेळपट्टी पहिल्या डावात फलंदाजांना मदत करत होती, पण सॅम अयुब पूर्णपणे फ्लॉप ठरला. सॅम अयुबने दोन्ही डावात मिळून ३९ धावा केल्या. सलामीवीर म्हणून सॅम अयुबचे अपयश हेही पाकिस्तानच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.

शाहीन आफ्रिदीची धुलाई

मुलतान कसोटी सामन्यात पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीची चांगलीच धुलाई झाली. इंग्लिश फलंदाजांसमोर तो पूर्णपणे असहाय्य दिसत होता. शाहीनने या सामन्यात पाकिस्तानसाठी २६ षटके टाकली ज्यात त्याने १२० धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. शाहीन आफ्रिदीचा फ्लॉप हेही पाकिस्तानच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.

Whats_app_banner