टीम इंडियाच्या जर्सीवर Dream 11 नाव छापण्यासाठी बीसीसीआय किती पैसे घेते? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टीम इंडियाच्या जर्सीवर Dream 11 नाव छापण्यासाठी बीसीसीआय किती पैसे घेते? जाणून घ्या

टीम इंडियाच्या जर्सीवर Dream 11 नाव छापण्यासाठी बीसीसीआय किती पैसे घेते? जाणून घ्या

Dec 12, 2024 11:55 AM IST

BCCI Title Sponsor Team India : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर नाव लिहिण्यासाठी कंपनी BCCI ला किती पैसे देते ते आपण येथे जाणून घेणार आहोत.

BCCI Title Sponsor Team India : टीम इंडियाच्या जर्सीवर Dream 11 नाव छापण्यासाठी बीसीसीआय किती पैसे घेते? जाणून घ्या
BCCI Title Sponsor Team India : टीम इंडियाच्या जर्सीवर Dream 11 नाव छापण्यासाठी बीसीसीआय किती पैसे घेते? जाणून घ्या (AFP)

Dream 11 Indian Cricket Team Jersey Sponsor: बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. BCCI ची एकूण संपत्ती १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. इंडियन प्रीमियर लीग, मीडिया हक्क आणि टायटल स्पॉन्सर हे उत्पन्नाचे काही मुख्य स्त्रोत आहेत.

इथे, विशेषत: आपण टायटल स्पॉन्सरशिपबद्दल जाणून घेणार आहोत. टीम इंडियाच्या जर्सीवर मोठ्या अक्षरात 'DREAM 11' लिहिलेले आपण गेल्या एक वर्षापासून पाहत आहोत. 

पण तुम्हाला माहीत आहे का? की जर्सीच्या समोरच्या बाजूला ब्रँडचे नाव लिहिण्यासाठी एखादी कंपनी बीसीसीआयला किती पैसे देत असेल?

ड्रीम ११ हा एक फॅन्टसी स्पोर्ट्स ब्रँड आहे, ज्याची एकूण संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. ड्रीम इलेव्हनने टीम इंडियाची स्पॉन्सरशीप राईट ३५८ कोटी रुपयांना विकत घेतले होते. 

बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांचा हा करार जुलै २०२३ ते मार्च २०२६पर्यंत चालणार आहे. बीसीसीआयने द्विपक्षीय मालिकेतील टायटल स्पॉन्सरशिपसाठी आधारभूत किंमत ३ कोटी रुपये प्रति सामना ठेवली होती.

भारतीय संघाच्या जर्सीवर पूर्वी एज्युकेशन ब्रँड (Byju's) लिहिलेला होते, जे प्रत्येक सामन्यासाठी ५.५ कोटी रुपये देत असे. आता भारताच्या पुरुष, महिला आणि अंडर-१९ स्तरावरील संघांच्या जर्सीवर मोठ्या इंग्रजी अक्षरात 'DREAM11' लिहिलेले दिसत आहे.

टीम इंडियाच्या सामन्यंचे मीडिया राईट्स कोणाकडे?

भारतीय क्रिकेट संघ आणि भारतातील क्रिकेटची लोकप्रियता लक्षात घेता प्रत्येक वेळी मीडियाचे हक्कही हजारो कोटींना विकले गेले आहेत. टीम इंडियाचे सध्याचे मीडिया राईट्स वायाकॉम नेटवर्ककडे आहेत. वायकॉमने सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२८ या काळातील भारताचे सामने प्रसारित करण्यासाठी ५,९६३ कोटी रुपये दिले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या