PSL ची बक्षीस रक्कम किती? आयपीएल सोडा, पाकिस्तान सुपर लीगची WPL शीही तुलना होऊ शकत नाही
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PSL ची बक्षीस रक्कम किती? आयपीएल सोडा, पाकिस्तान सुपर लीगची WPL शीही तुलना होऊ शकत नाही

PSL ची बक्षीस रक्कम किती? आयपीएल सोडा, पाकिस्तान सुपर लीगची WPL शीही तुलना होऊ शकत नाही

Mar 19, 2024 12:16 PM IST

IPL And PSL Prize Money : पीएसएल २०२४ च्या फायनलमध्ये शादाब खानची टीम इस्लामाबाद युनायटेड आणि मोहम्मद रिझवानची टीम मुलतान सुलतान आमनेसामने होती. या सामन्यात मुल्तानने इस्लामाबादला १६० धावांचे लक्ष्य दिले होते. इस्लामाबादने हे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर गाठले.

IPL And PSL Prize Money PSL ची बक्षीस रक्कम किती? आयपीएल सोडा, पाकिस्तान सुपर लीगची WPL शीही तुलना होऊ शकत नाही
IPL And PSL Prize Money PSL ची बक्षीस रक्कम किती? आयपीएल सोडा, पाकिस्तान सुपर लीगची WPL शीही तुलना होऊ शकत नाही

IPL, WPL And PSL Prize Money comparison:  इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) धर्तीवर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (PSL) सुरू करण्यात आली. तेव्हापासून दोन्ही देशांच्या लीगची वेळोवेळी तुलना केली जाते. अशातचा सोमवारी (१८ मार्च)  PSL 2024 चा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

IPL 2024 : आयपीएलमध्ये संघांची कमाई कशी होते? खेळाडूंवर किती खर्च होतो? जाणून घ्या

पीएसएल २०२४ च्या फायनलमध्ये शादाब खानची टीम इस्लामाबाद युनायटेड आणि मोहम्मद रिझवानची टीम मुलतान सुलतान आमनेसामने होती. या सामन्यात मुल्तानने इस्लामाबादला १६० धावांचे लक्ष्य दिले होते. इस्लामाबादने हे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर गाठले.

दरम्यान, PSL च्या फायनलनंतर आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग यांची बक्षीस रक्कम हा चर्चेचा विषय ठरला आहे.

PSL ची बक्षीस रक्कम WPL पेक्षा कमी 

पाकिस्तानी चाहते नेहमीच PSL आणि IPL यांची तुलना करत असतात आणि पाकिस्तान सुपर लीग ही इंडियन प्रीमियर लीगपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगत असतात. पण दोन्ही लीगच्या बक्षीर रकमेत फार मोठा फरक आहे.

PSL ची बक्षीस रक्कम ही भारतातील महिली प्रीमियर लीगपेक्षाही कमी आहे. यंदाचे पीएसएल विजेते शादाब खानच्या इस्लामाबाद युनायटेडला ४.१३ कोटी रुपये बक्षीर रक्कम मिळाली. 

तर महिला प्रीमियर लीगमधील विजेता आरसीबीला६ कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षीच्या म्हणजेच आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. म्हणजेच आयपीएलची बक्षीस रक्कम पीएसएलच्या बक्षीस रकमेपेक्षा जवळपास पाचपट जास्त आहे.

पीएसएल २०२४ उपविजेत्या मुलतान सुलतान्सला सुमारे १.६५कोटी रुपये, तर आयपीएल २०२३ उपविजेत्या गुजरात टायटन्सला १२.५ कोटी रुपये देण्यात आले. महिला प्रीमियर लीगबद्दल बोलायचे झाले तर, उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला सुमारे ३ कोटी रुपये मिळाले.

Whats_app_banner