Vinod Kambli Big Boss : भारतीय क्रिकेट संघाची माजी खेळाडू विनोदी कांबळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आहे. कांबळीने अलीकडेच सचिन तेंडुलकरसोबत त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती कार्यक्रमात हजेरी लावली होती.
या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यामध्ये तो सचिन तेंडुलकरचा हातात हात घेऊन बोलताना दिसला. तेव्हापासून प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्याबद्दल खूप चर्चा होत आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये विनोद कांबळी आर्थिक संकटातून जात असल्याचा दावा केला जात आहे. बीसीसीआयने दिलेल्या पेन्शनवर तो जगत आहे, पण एक काळ असा होता की कांबळीची नेट वर्थ करोडोंमध्ये होती. फक्त क्रिकेटच नाही तर कांबळीने चित्रपट आणि टीव्हीच्या दुनियेतही आपलं नाव कमावलं.
कांबळी भारतातील अशाच एका लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता. या शोमध्ये नंतर माजी क्रिकेटर श्रीशांतही आला होता. अशा परिस्थितीत श्रीशांतच्या तुलनेत या शोमध्ये विनोद कांबळी याला किती फी मिळाली होती, ते जाणून घेऊया.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. हा रिॲलिटी शो भारतात खूप प्रसिद्ध आहे. या सीझनमध्ये बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन हे बिग बॉसचे होस्ट होते. विनोद कांबळीने या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती.
मात्र, अवघ्या १४ दिवसांनी तो शोमधून बाहेर पडला. या शोमधील त्याच्या फीबद्दल बोलायचे झाले तर ती खूपच कमी होते. रिपोर्ट्सनुसार, विनोद कांबळीला बिग बॉस-२ मध्ये दर आठवड्यासाठी १.५ ते २ लाख रुपये फी मिळाली होती.
माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतनेही बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. तथापि, श्रीसंत बिग बॉसच्या १२व्या सीझनमध्ये दिसला होता. बिग बॉस १२ चा होस्ट सलमान खान होता आणि स्पर्धकांच्या फीमध्येही लक्षणीय वाढ झाली होती.
संबंधित बातम्या