Ricky Ponting Arguing With Umpires : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ मध्ये विजयरथावर स्वार आहे. राजस्थानने सलग दुसरा सामना जिंकला. गुरुवारी (२८ मार्च) जयपूर येथे झालेल्या सामन्यात राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) १२ धावांनी पराभव केला.
पण या सामन्यातदरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पॉंटिंग चांगलाच चिडेलला दिसला. कारण राजस्थानने सामन्यात ५ विदेशी खेळाडूंचा वापर केला, असे त्याचे मत होते. याबाबत पॉंटिंग चौथ्या पंचांशी वाद घालतानाही दिसला.
यानंतर आता राजस्थानने खरंच ५ विदेशी खेळाडू खेळवले का आणि एक संघ किती परदेशी खेळाडूंचा मैदानावर वापर करू शकतो, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. चाहत्यांच्या मनातील हाच संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत.
नियम १.२.५: या निमयानुसार आयपीएलमध्ये प्रत्येक संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त ४ परदेशी खेळाडूंना खेळवू शकतो.
नियम 1.2.5 हे सांगतो की, प्रत्येक संघ कोणत्याही सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 पेक्षा अधिक परदेशी खेळाडूंचा समावेश करु शकत नाही.
नियम २.२.६: या निमयानुसार, कोणत्याही सामन्यादरम्यान कोणत्याही प्रसंगी फिल्डिंग करणारा संघ 4 पेक्षा अधिक परदेशी खेळाडू मैदानावर असू शकत नाहीत. जर संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वाधिक ४ परदेशी खेळाडूंची नावे दिली असतील तर बदली खेळाडूच्या रुपात परदेशी खेळाडूच्या जागी परदेशी खेळाडूलाच मैदानात उतरवता येईल.
जर प्लेइंग इलेव्हन वेळी एखाद्या संघाने ४ पेक्षा कमी परदेशी खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला असेल तर फिल्डिंगवेळी बदली खेळाडूच्या रुपात नियमानुसार, ४ परदेशी खेळाडू फिल्डिंगसाठी उतरवता येऊ शकते.
राजस्थान रॉयल्सने जोस बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट या तीन परदेशी खेळाडूंना सुरुवातीच्या प्लेइंग-११ मध्ये ठेवले. नंतर शिमरॉन हेटमायरच्या जागी नँद्रे बर्गरला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून स्थान देण्यात आले, तर रोव्हमन पॉवेलला अतिरिक्त पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरवण्यात आले. तसे पाहिले तर राजस्थान रॉयल्सने नियमांच्या मर्यादेत राहून हा निर्णय घेतला होता.