आयपीएल २०२५ चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. ५ वेळा चॅम्पियन असलेल्या या संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यापैकी सलग ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच संघाने सलग इतके सामने गमावले आहेत. विशेष म्हणजे ५ पैकी ३ पराभव चेपॉकच्या बालेकिल्ल्यात झाले आहेत. एमए चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेने पराभवाची हॅटट्रिक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कर्णधार ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नवीन कर्णधार एमएस धोनीमुळे सीएसकेचे नशीब पालटेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी केकेआरविरुद्ध त्यांना ८ गडी राखून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवानंतरही त्यांना प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. जाणून घेऊया सीएसकेचे प्लेऑफ समीकरण-
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी १ विजय मिळवला आहे. या मोसमात त्यांना अजून ८ सामने खेळायचे आहेत. जर सीएसकेला या ८ पैकी ७ सामने जिंकता आले तर त्यांच्या खात्यात १६ गुण जमा होतील आणि आयपीएलच्या इतिहासात असे दिसून आले आहे की संघ बर्याचदा १६ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरतात. दुसरीकडे चेन्नईने ८ पैकी ८ सामने जिंकले तर त्यांच्या खात्यात १८ गुण जमा होतील तर त्यांना बाद फेरीत नक्कीच स्थान मिळेल.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला २० षटकांत केवळ १०३ धावा करता आल्या. अखेरच्या काही षटकांत शिवम दुबेने (३१) काही धावा केल्या, ज्यामुळे संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. केकेआरने १०.१ षटकांत ८ गडी बाद करत या धावसंख्येचा पाठलाग केला. सुनील नारायणने ४४ धावांची धडाकेबाज खेळी केली. याशिवाय त्याने गोलंदाजीत १३ धावांत ३ विकेट घेत सीएसकेचे कंबरडे मोडले. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संबंधित बातम्या