मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  हिरो नहीं बनने का… रोहितच्या सल्ल्याने सरफराजला वाचवलं, नाहीतर हिरो होण्याआधीच करिअर संपलं असतं

हिरो नहीं बनने का… रोहितच्या सल्ल्याने सरफराजला वाचवलं, नाहीतर हिरो होण्याआधीच करिअर संपलं असतं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 10, 2024 11:13 AM IST

Rohit Sharma Sarfaraz Khan : रांची कसोटीत टीम इंडियाने दमदार विजय मिळवला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, पण त्याच्या फलंदाजीपेक्षाही या सामन्यातील त्याच्या एका वन लाइनरने बरीच चर्चा मिळवली होती.

Rohit Sharma Sarfaraz Khan : हिरो नहीं बनने का… रोहितच्या सल्ल्याने सरफराजला वाचवलं, नाहीतर हिरो होण्याआधीच करिअर संपलं असतं
Rohit Sharma Sarfaraz Khan : हिरो नहीं बनने का… रोहितच्या सल्ल्याने सरफराजला वाचवलं, नाहीतर हिरो होण्याआधीच करिअर संपलं असतं

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. या सोबत भारताने ही मालिका ४-१ अशी आपल्या नावावर केली आहे.

दरम्यान, या सामन्याच्या दुसऱ्या डावात सरफराज खान थोडक्यात बचावला. वास्तविक, सरफराज शॉर्ट लेगवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी कुलदीपच्या एका शॉर्ट चेंडूवर इंग्लंडच्या शोएब बशीरने जोरदार फटका मारला. हा फटका इतका ताकदवान होता की, सरफराजला हलताही आले नाही आणि बशीरने मारलेला चेंडू थेट सरफराजच्या डोक्यावर आदळला. पण सरफराजने हेल्मेट घातल्याने तो मोठा अनर्थ टळला.

'हिरो नहीं बनने का'

या घटनेनंतर आता चाहत्यांना रोहित शर्माच्या एका लाखमोलाच्या सल्ल्याची आठवण होत आहे. हा सल्ला रोहितने मालिकेतील चौथ्या कसोटीत दिला होता.

रांची कसोटीत टीम इंडियाने दमदार विजय मिळवला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, पण त्याच्या फलंदाजीपेक्षाही या सामन्यातील त्याच्या एका वन लाइनरने बरीच चर्चा मिळवली होती.

रांची कसोटीत रोहितने सरफराजला फलंदाजाच्या जवळ फिल्डिंग करताना नेहमी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता. 'हीरो नही बनने का, हेल्मेट पहनने का', असे रोहितने म्हटले होते. आता रोहित शर्माचे हेच शब्द धर्मशाला कसोटीत सरफराजसाठी वरदान ठरले आहेत.

सरफराजच्या वडिलांनी रोहितला विनंती केली होती

इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यात सरफराज खानला पदार्पणाची कॅप मिळाली. तेव्हा तो खूप भावूक झाला होता. डेब्यू कॅप मिळताच तो वडिलांकडे धावत गेला. यानंतर त्याच्या वडिलांनी रोहित शर्माचे आभार मानले आणि सोबतच रोहितला सरफराजची काळजी घेण्याची विनंती केली. धरमशाला कसोटीत जे घडले त्यावरून रोहितला त्याच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे लक्षात असतात हे सिद्ध झाले.

WhatsApp channel